Advertisement

दक्षिण मध्य रेल्वे, बीपीसीएल उपांत्य फेरीत


दक्षिण मध्य रेल्वे, बीपीसीएल उपांत्य फेरीत
SHARES

गतविजेत्या दक्षिण मध्य रेल्वे अाणि भारत पेट्रोलियम काॅर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) या संघांनी अापल्या कामगिरीत सातत्य राखून उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात विजय मिळवत ५२व्या बाॅम्बे गोल्ड कप हाॅकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मजल मारली अाहे.


दक्षिण मध्य रेल्वेची कॅगवर मात

चर्चगेट येथील एमएचएएल-महिंद्रा स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत सिकंदराबादच्या दक्षिण मध्य रेल्वेने दिल्लीच्या महालेखापाल (कॅग) संघाचा २-० असा पाडाव केला. अटीतटीच्या झालेल्या या लढतीत लव्हप्रीत सिंगने ९व्या मिनिटाला अाणि पोनाचा एम.जी. याने ५९व्या मिनिटाला गोल करत दक्षिण मध्य रेल्वेला विजय मिळवून दिला. या विजयासह गतविजेत्यांनी अापले जेतेपद कायम राखण्याच्या दिशेने वाटचाल केली.


बीपीसीएलचा अोएनजीसीवर सहज विजय

अनेक अाॅलिम्पियन अाणि दिग्गज हाॅकीपटूंचा सहभाग असलेल्या बीपीसीएल संघाने सांघिक खेळाचे प्रदर्शन केलं. प्रतिस्पर्ध्यांच्या गोलक्षेत्रात अनेक हल्ले चढवत बीपीसीएलने अोएनजीसीचा बचाव खिळखिळा केला, त्यामुळे त्यांनी ५-२ अशा फरकाने सहज विजय मिळवला. बीपीसीएलकडून एस. व्ही. सुनील (अाठव्या मिनिटाला), अामीर खान (९व्या अाणि ६१व्या मिनिटाला) ललित उपाध्याय (२४व्या मिनिटाला) अाणि जर्नेल सिंग (५६व्या मिनिटाला) यांनी गोल केले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा