दक्षिण मध्य रेल्वेकडून मुंबई कस्टम्सचा ४-० ने धुव्वा


दक्षिण मध्य रेल्वेकडून मुंबई कस्टम्सचा ४-० ने धुव्वा
SHARES

गतविजेत्या दक्षिण मध्य रेल्वे संघाने ५२व्या बाॅम्बे गोल्ड कप हाॅकी स्पर्धेतील अ गटातील सलामीच्या सामन्यात मुंबई कस्टम्सचा ४-० असा धुव्वा उडवत शानदार सुरुवात केली. चर्चगेट येथील मुंबई हाॅकी असोसिएशन लिमिटेडच्या महिंद्रा स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात राजू पाल (तिसऱ्या मिनिटाला), अजित पांडे (८व्या मिनिटाला), इनोसंट कुल्लू (३०व्या मिनिटाला) अाणि लव्हप्रीत सिंग (७०व्या मिनिटाला) यांनी गोल करत सिकंदराबादच्या या संघाला दणदणीत विजय मिळवून दिला.


'कॅग'चीही विजयी सलामी

दिल्ली येथील भारतीय महालेखापाल (कॅग) संघाने मुंबईस्थित सेंट्रल रेल्वेचा ४-२ असा पाडाव केला. विक्टो सिंगच्या पासवर विनित कांबळेने तिसऱ्या मिनिटालाच सेंट्रल रेल्वेसाठी खाते खोलले. त्यानंतर २९व्या मिनिटाला पेनल्टी काॅर्नरवर गोल करून चंदन सिंगने कॅगला बरोबरी साधून दिली. सहा मिनिटानंतर नितिन थिमय्याने गोल करून कॅगला अाघाडी मिळवून दिली. मध्यंतरानंतर कॅगसाठी मिथिलेश कुमार अाणि कॅप्टन सिंग याने गोल करून कॅगला विजय मिळवून दिला.

संबंधित विषय