Advertisement

स्पर्श फेरवानी ठरला महाराष्ट्राचा ज्युनियर बिलियर्डस चॅम्पियन


स्पर्श फेरवानी ठरला महाराष्ट्राचा ज्युनियर बिलियर्डस चॅम्पियन
SHARES

क्रिकेट क्लब अाॅफ इंडियाच्या स्पर्श फेरवानी याने खार जिमखान्याच्या बीएसएएम सबज्युनियर अाणि ज्युनियर बिलियर्डस व स्नूकर स्पर्धेत महाराष्ट्राचा ज्युनियर स्नूकर अाणि बिलियर्डस या दोन्ही प्रकारांमध्ये चॅम्पियन होण्याचा मान पटकावला. या दोन्ही प्रकारात भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू असलेला स्पर्श याने बिलियर्डस अाणि स्नूकर प्रकाराच्या अंतिम फेरीत रेडियो क्लबच्या रयान राझमी याचा पराभव केला. रयान हा महाराष्ट्राचा अव्वल क्रमांकाचा खेळाडू अाहे.


स्नूकरमध्ये रंगली कडवी चुरस

स्नूकर प्रकाराच्या अंतिम फेरीत रयानने स्पर्शला कडवी टक्कर दिली. स्पर्शने पहिल्याच फ्रेममध्ये ११९ गुण मिळवत सुरेख सुरुवात केली. दुसऱ्या फ्रेममध्ये मात्र रयानने जशास तसे प्रत्युत्तर दिले, मात्र तिसऱ्या फ्रेममध्ये त्याला हार पत्करावी लागली. चौथ्या फ्रेममध्ये पुन्हा कमबॅक करत रयानने सामना २-२ असा बरोबरीत अाणला. अखेर स्पर्शने अंतिम फ्रेममध्ये विजय मिळवत हा सामना ११९-४, ५८-८४, ५३-४७, ३५-७२, ७२-२६ असा जिंकला.


दोन तास रंगली बिलियर्डसची फायनल

बिलियर्डसची अंतिम फेरी चुरशीची झाली. दोन तास रंगलेल्या या सामन्यात अखेर स्पर्शने रयानचे कडवे अाव्हान मोडीत काढले. स्पर्शने हा सामना ५४५-३९१ गुणांनी जिंकत बिलियर्डसमध्येही चॅम्पियन होण्याची करामत केली. 


हेही वाचा -

अजिंक्य रहाणेला मिळणार बर्थडे गिफ्ट?

मादाम तुसाँमध्ये अवतरला विराट कोहलीचा मेणाचा पुतळा

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा