Advertisement

कडव्या झुंजीनंतर यूनियन बँक पराभूत


कडव्या झुंजीनंतर यूनियन बँक पराभूत
SHARES

मुंबईच्या यूनियन बँक अाॅफ इंडियाने कडवी लढत दिली खरी पण त्यांना ५२व्या बाॅम्बे गोल्ड कप हाॅकी स्पर्धेच्या ड गटातील अखेरच्या साखळी सामन्यात दिल्लीच्या पंजाब नॅशनल बँकेकडून २-३ असा पराभव पत्करावा लागला.


चर्चगेट येथील एमएचएएल-महिंद्रा स्टेडियमवर शुक्रवारी रंगलेल्या या सामन्यात, गेल्या महिन्यात शास्त्री हाॅकी अाणि नेहरू हाॅकी स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या पंजाब नॅशनल बँकेने ११व्या मिनिटालाच शमशेर सिंगने केलेल्या मैदानी गोलाच्या बळावर अाघाडी घेतली होती. त्यानंतर संजयने गोल करून त्यांना २९व्या मिनिटाला २-० अशी अाघाडी मिळवून दिली.


मध्यंतरानंतर यूनियन बँकेने तोडीस तोड उत्तर देत नितीन कुमार (४८व्या मिनिटाला) अाणि अाकिब रहिम (५४व्या मिनिटाला) यांनी केलेल्या गोलांच्या बळावर बरोबरी साधली. यूनियन बँकेने अाघाडी घेण्याचा प्रयत्न केला, पण हा प्रयत्न त्यांच्याच अंगाशी अाला. सुखजित सिंगने ६१व्या मिनिटाला गोल करून पंजाब नॅशनल बँकेला विजय मिळवून दिला.


इंडियन अाॅईलचा सहज विजय

मुंबईच्या इंडियन अाॅईल संघाने मुंबईच्याच इंडियन नेव्ही संघावर ६-३ असा अारामात विजय मिळवला. इंडियन अाॅईलचा कर्णधार अाणि अाॅलिम्पियन रघुनाथ वोक्कालिगा याने ३९व्या अाणि ६६व्या मिनिटाला तर अफ्फान युसूफने ५८व्या अाणि ७०व्या मिनिटाला गोल करून इंडियन अाॅईलच्या विजयात मोलाचा हातभार लावला. विक्रमजित सिंग (७व्या मिनिटाला) अाणि भारताचा माजी खेळाडू भरत चिकारा (२९व्या मिनिटाला) यांनीही विजयात योगदान दिले. नेव्हीकडून वेद प्रकाश (२०व्या मिनिटाला), एस. कुमार (४५व्या मिनिटाला) अाणि मोहित ठाकूर (४७व्या मिनिटाला) यांनी गोल केले.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा