सेंट पॉलने चेंबूरच्या वायएमसीएला दिली मात

 Parel
सेंट पॉलने चेंबूरच्या वायएमसीएला दिली मात
Parel, Mumbai  -  

मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशन लीग 2016-17 च्या तिसऱ्या विभागीय सामन्यात सेंट पॉल शाळेच्या एससी 'बी' संघातील आघाडीच्या फळीतील खेळाडू अमित सांगवानने शानदार गोल नोंदवून चेंबूरच्या वायएमसीएला 3-1 ने मात दिली. परळ इथल्या सेंट झेवियर्स मैदानात हा सामना रंगला होता.

सामना सुरू झालेल्या तिसऱ्या मिनिटाला गोल नोंदवून महादेव कोंडुकरने सेंट पॉलच्या विजयासाठी महत्त्वाची कामगिरी केली. तर सामन्याच्या दहाव्या मिनिटाला सांगवानने गोल नोंदवत 2-1 अशी आघाडी घेतली. त्यानंतर सांगवानने लगेचच तिसरा गोल नोंदवून सामना जिंकला.

Loading Comments