Advertisement

सेंट स्टॅनिस्लाॅस हायस्कूल अांतरशालेय हाॅकी स्पर्धेचा चॅम्पियन


सेंट स्टॅनिस्लाॅस हायस्कूल अांतरशालेय हाॅकी स्पर्धेचा चॅम्पियन
SHARES

वांद्रे येथील सेंट स्टॅनिस्लाॅस हायस्कूलने अटीतटीच्या लढतीत माटुंग्याच्या डाॅन बाॅस्को हायस्कूलचा २-१ असा पराभव करून अांतरशालेय हाॅकी स्पर्धेत चॅम्पियन होण्याचा मान पटकावला. चर्चगेट येथील एमएचएएल ग्राउंडवर अाॅलिम्पिक दिनानिमित्त झालेल्या या हाॅकी स्पर्धेत सेंट स्टॅनिस्लाॅसच्या युवा हाॅकीपटूंनी अाश्वासक सुरुवात केली खरी. पण डाॅन बाॅस्कोने कडवी लढत देत त्यांच्यासमोर अाव्हान निर्माण केले. अखेर अापला खेळ उंचावत सेंट स्टॅनिस्लाॅसने विजेतेपदाला गवसणी घातली.


नोया डीमेलोचा पहिला गोल

मुंबई हाॅकी असोसिएशन लिमिटेडतर्फे (एमएचएएल) अायोजित करण्यात अालेल्या या स्पर्धेत कर्णधार नोया डीमेलोने चौथ्या मिनिटालाच गोल करून सेंट स्टॅनिस्लाॅसला अाघाडी मिळवून दिली. त्यांनी जोरदार हल्ले चढवत डाॅन बाॅस्कोसमोर अाव्हान निर्माण केले. कायले जस्टिनने २५व्या मिनिटाला गोल करत सेंट स्टॅनिस्लाॅसची अाघाडी २-० अशी वाढवली.


डाॅन बाॅस्कोचे चोख प्रत्युत्तर

पहिल्या दोन धक्क्यातून सावरत डाॅन बाॅस्कोनेही निकराची झुंज दिली. २७व्या मिनिटाला ख्रिस बेन्सनच्या गोलमुळे डाॅन बाॅस्कोने पिछाडी कमी करण्याचा प्रयत्न केला. पण डाॅन बाॅस्कोला दुसरा गोल रचून बरोबरी साधण्यात अपयश अाले. सेंट स्टॅनिस्लाॅसचा भक्कम बचाव त्यांना भेदताच अाला नाही.


अाॅलिम्पियन्सच्या हस्ते गौरव

उपांत्य फेरीत डाॅन बाॅस्कोने चिल्ड्रन अकादमीवर ४-१ असा तर सेंट स्टॅनिस्लाॅसने अवर लेडी अाॅफ डाेलोर्स हायस्कूलवर ५-१ असा दणदणीत विजय मिळवला होता. विजेत्या संघाला अाॅलिम्पियन मार्सेलस गोम्स तसेच सेंट स्टॅनिस्लाॅसचा माजी विद्यार्थी व अाॅलिम्पियन देविंदर वाल्मिकी, भारताचा हाॅकीपटू युवराज वाल्मिकी यांच्या हस्ते गौरवण्यात अाले.


हेही वाचा -

केदार जाधवला वेध पुनरागमनाचे!

रमेश पोवारलाही व्हायचंय मुंबईचा प्रशिक्षक!



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा