Advertisement

झेविअर्समध्ये स्पोर्टस् डे ची धूम


झेविअर्समध्ये स्पोर्टस् डे ची धूम
SHARES

सीएसटी - सीएसटीमधील झेविअर्समध्ये येत्या 29 नोव्हेंबरला स्पोर्ट्स डेचे आयोजन करण्यात आलंय. हा स्पोर्टस् डे दोन टप्प्यात होईल. 29 नोव्हेंबरला झोनल राऊंड असेल तर 2 डिसेंबरला अंतिम फेरी असणार आहे. तसेच एकेरी आणि ग्रुपप्रमाणे संघाचं विभाजन करण्यात आलंय. यात क्रिकेट, हॉलिबॉल, फुटबॉल, कॅरम, बुद्धीबळ अशा 20 खेळांचा सहभाग असणार आहे. मरिन लाईन्स येथील मुंबई युनिव्हर्सिटी ग्राऊंडवर सकाळी 9 पासून स्पर्धेला सुरूवात होईल. तर प्राथमिक फेरी दुपारी 1 ते 5 दरम्यान रंगेल.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा