मुंबई मॅरेथॉनच्या आयोजकांना महापालिकेची नोटीस

 Pali Hill
मुंबई मॅरेथॉनच्या आयोजकांना महापालिकेची नोटीस

मुंबई - स्टॅण्डर्ड चार्टर्ड मुंबई मॅरेथॉनच्या आयोजकांच्या नाड्या महापालिकेने आवळळ्या आहेत. पालिकेने मॅरेथॉनच्या आयोजकांकडून जाहिरातींसाठी तब्बल 5 कोटी 48 लाखांचे शुल्क आकारले आहे. शुल्काची ही रक्कम त्वरित भरण्यासाठी नोटीस बजावली आहे. मात्र, रक्कम न भरल्यास खटला चालवला जाईल, असा इशारा महापालिकेने दिला आहे.

स्टॅण्डर्ड चार्टर्डच्यावतीने आयोजित करण्यात येणाऱ्या मुंबई मॅरेथॉनला दरवर्षी जाहिरातीसाठी किमान 22 लाख रुपये शुल्क आकारले जाते. मॅरेथॉन स्पर्धेसाठी आयोजकांनी महापालिकेची परवानगी घेतली आहे. त्यासाठी 5 लाख 89 शुल्क त्यांनी भरले आहे. परंतु यासाठी जाहिरात शुल्क तसेच इतर सुविधांसाठीचे शुल्क त्यांनी भरलेले नाही. यासाठी 5 कोटी 48 लाख रुपये भरण्यासाठी आयोजकांना पत्र पाठवले असल्याची माहिती 'ए' विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली. दरम्यान, आयोजकांनी हे पाच कोटींचे शुल्क भरण्यास असमर्थता दर्शवली आहे.

Loading Comments