टीम इंडिया ठरली चॅम्पियन

  Mumbai
  टीम इंडिया ठरली चॅम्पियन
  मुंबई  -  

  धर्मशाला - गुढी पाडव्याच्या दिवशी भारतीय टीमने विजयाची गुढी उभारली. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघानं धर्मशालामध्ये ऑस्ट्रेलियाचा 8 गडी राखून दणदणीत पराभव केला. भारतानं चार सामन्यांची कसोटी मालिकाही 2-1च्या फरकानं खिशात घातली. या विजयामुळे सलग सहा कसोटी मालिका जिंकण्याचा इतिहास भारतानं रचला आहे. दुखापतीमुळे विराटच्या ऐवजी संघाचे नेतृत्व मराठमोळ्या अजिंक्य रहाणे याने केले. पहिल्या डावात भारतानं ऑस्ट्रेलियाला 300 धावांवर रोखले.

  मात्र, भारतालाही पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारता आली नव्हती. पहिल्या डावात भारतानं ऑस्ट्रेलियावर अवघ्या 32 धावांची आघाडी घेतली होती. त्यामुळे सामना अनिर्णित राहतो की काय अशी स्थिती होती. मात्र, दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करून सामना निर्णायक अवस्थेत आणला. सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी भारतानं ऑस्ट्रेलियाला अवघ्या 137 धावांत गुंडाळले. मात्र भारतानं 2 विकेट्स गमावत सामना अखेर खिशात घातला.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.