Advertisement

'त्या'प्रकरणी क्विंटन डी कॉकनं मागितली माफी; गुडघे टेकवण्याची दिली कबूली


'त्या'प्रकरणी क्विंटन डी कॉकनं मागितली माफी; गुडघे टेकवण्याची दिली कबूली
SHARES

गुरुवार, २८ ऑक्टोबर रोजी, दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक-फलंदाज क्विंटन डी कॉकने मंगळवारी, २६ ऑक्टोबर रोजी वेस्ट इंडिज विरुद्ध संघाच्या आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक सामन्यातून बाहेर काढल्यावर संघातील सहकारी आणि त्याच्या चाहत्यांची ट्विटरवरून माफी मागितली. या सामन्यादरम्यान त्याने गुडघा टेकण्यास नकार दिला. दक्षिण आफ्रिकेसाठी होणाऱ्या आगामी सामन्यांमध्ये आपण गुडघे टेकणार असल्याचेही त्याने कबूल केले.

आयसीसी विश्वचषकात मंगळवारी झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक क्विंटन डी कॉक खेळला नव्हता. यामागे त्याची वैयक्तिक अनुपलब्धता कारणीभूत असल्याचं सांगितलं जात आहे. पण दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाच्या आदेशाचे पालन न केल्यामुळे क्विंटनला संघातून वगळण्यात आल्याचं मानलं जात आहे. 

संघाचा स्टार खेळाडू आणि माजी कर्णधार डी कॉकने ब्लॅक लाईफ मॅटर्सला पाठिंबा देण्यासाठी सामन्यापूर्वी गुडघे टेकण्यास नकार दिला. समालोचन पॅनलचा भाग असलेला भारतीय यष्टिरक्षक दिनेश कार्तिकने हे शेअर केलं होतं. त्याने ट्विट केले की क्विंटन डी कॉक आजचा सामना खेळत नाही; कारण त्याने ब्लॅक लाइव्ह्स मॅटर मोहिमेवर आपली भूमिका घेतली. यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या विश्वचषकातील पहिल्या सामन्यातही डी कॉक सहभागी झाला नव्हता.

या विश्वचषकापूर्वी संघातील खेळाडूंना BLM ला (Black Life Matters) सपोर्ट करण्यासाठी ३ पर्याय आहेत, असे ठरवण्यात आले होते. पहिला म्हणजे जमिनीवर एक गुडघा टेकून उभे राहून हवेत मूठ फिरवत राहणे, दुसरे म्हणजे फक्त हवेत मुठी धरून उभे राहणे आणि तिसरे सावध पवित्र्यात उभे राहणे. हा नियम सर्व खेळाडूंसाठी आणि संघातील इतर सदस्यांसाठी होता.

पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात क्विंटन डी कॉकनं या ३पैकी कोणत्याही शारीरिक स्थितीचं पालन केलं नाही. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात जाण्यापूर्वी, दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डानं एक फर्मान जारी केले होते की, संघातील सर्व खेळाडूंना यात सहभागी व्हावे लागेल. पण डी कॉकने ते स्वीकारण्यास नकार दिला आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यापूर्वी वैयक्तिक कारणांमुळे स्वतःला सामन्यातून बाहेर काढले. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेनं हे प्रकरण गांभीर्यानं घेतलं आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा