Advertisement

ठाण्याची अग्रता निघाली लंडनला!


ठाण्याची अग्रता निघाली लंडनला!
SHARES

ठाण्याची युवा अाणि विक्रमी गोळाफेकपटू अग्रता मेलकुंडे हिला अाता लंडनमध्ये जाऊन अद्ययावत प्रशिक्षण घेण्याचे वेध लागले अाहेत. केंद्रीय क्रीडा मंत्रालय आणि टाटा टीतर्फे नवी दिल्लीत अखिल भारतीय स्तरावर घेतलेल्या निवड चाचणी स्पर्धेमधून अग्रताची लंडनमधील प्रगत प्रशिक्षण अाणि स्थानिक स्पर्धांमध्ये सामील होण्यासाठीच्या शिष्यवृत्तीसाठी निवड झाली अाहे. या शिष्यवृत्तीसाठी निवडण्यात आलेली अग्रता ही महाराष्ट्रातील एकमेव खेळाडू ठरली आहे. लंडनमध्ये लाॅबोरो विद्यापीठात अग्रतासह देशभरातून निवडण्यात आलेले धावपटू इंग्लडच्या माजी ऑलिम्पियन खेळाडूंकडून त्यांच्या क्रीडा प्रकारातील विविध बारकावे आणि इतर गोष्टी शिकतील.


का केली गोळाफेकची निवड

नुकतीच दहावीची परीक्षा दिलेल्या अग्रतानं वयाच्या आठव्या वर्षांपासून खेळण्यास सुरुवात केली. पाश्चिमात्य नृत्यात पदविकाधारक असलेल्या अग्रताने केवळ फिटनेससाठी म्हणून अॅथलेटिक्सचा सराव करण्यास सुरुवात केली. त्यानंतर मैदानी खेळांची आवड निर्माण झाल्यामुळे विशेषतः गोळाफेक क्रीडाप्रकाराची भुरळ पडल्याने अग्रताने त्याच क्रीडा प्रकराची निवड केली.



७८ पदकांची मानकरी

सेंट जॉन बॅप्टिस्ट स्कूलची विद्यार्थिनी असलेल्या अग्रताने तरविंदरसिंग सोधी यांच्या मार्गदशनाखाली गोळाफेकीचे धडे गिरवले. सुरुवातीपासूनच विजयाची सवय अंगवळणी पडलेल्या अग्रताने आतापर्यंत जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर विविध विक्रमांसह ७८ पदके आपल्या खात्यात जमा केली आहेत. अग्रताने आतापर्यंत ३८ जिल्हास्तरीय, १८ राज्यस्तरीय आणि १० राष्ट्रीय स्पर्धामध्ये सहभागी होत आपली छाप पाडली आहे.


हेही वाचा -

राष्ट्रकुलमध्ये ठाण्याच्या मधुरिका पाटकरला टेबल टेनिसमध्ये सांघिक सुवर्णपदक

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा