• टोनी प्रिमियर लीगमध्ये सेलिब्रिटिंचाही सहभाग
  • टोनी प्रिमियर लीगमध्ये सेलिब्रिटिंचाही सहभाग
SHARE

वांद्रे - प्रतिवर्षी सेंट अँन्ड्र्युज महाविद्यालयात सादर होणाऱ्या टोनी प्रिमियर लिगची यंदाची सुरुवात खूप खास होती. 7 मार्चपासुन टोनी प्रिमियर लिगला सुरुवात झाली. ही लीग महिनाभर दर शनिवारी आणि रविवारी रात्री सेंट अँन्ड्रुज महाविद्यालयात रंगणार आहे. टोनी प्रिमियर लीग म्हणजे अर्थातच क्रिकेट स्पर्धा. परंतु टोनी प्रिमियर लीग ही आगळी वेगळी क्रिकेट स्पर्धा आहे. यंदा या प्रिमियर लिगमध्ये 8 संघांचा समावेश आहे. क्रिकेट सामन्यात वांद्रेतील काही सेलिब्रिटींचा देखील सामावेश आहे. त्यात प्रामुख्याने बॉबी देओल, सोहेल खान, जय भानुशाली, ओमकार कपूर, वत्सल शेट आदींचा सामावेश आहे. लिगचा पहिला सामना बॉबी देओलच्या मुंबई हिरो संघात आणि रोशन सचदेवच्या सच इंडियन्स संघात खेळवला गेला. यात सच इंडियन्स संघाने 7 धावंची बढत ठेवत विजय मिळवला. सर्व सामने 10 ओवरचे खेळवले जातात.

टोनी प्रिमियर लीग ही दरवर्षी आयोजित केली जाणारी क्रिकेट स्पर्धा आहे. ही क्रिकेट स्पर्धा महिनाभर शनिवारी आणि रविवारी रात्री रंगते. टोनी प्रिमियर लीग भरवण्याचे उद्दिष्टे म्हणजे वांद्रे येथील रहिवाशांना एकत्र आणणे आहे. लोकांना परस्पर भेटीसाठी खूप कमी वेळ मिळतो. फिट राहाण्याकरीता खेळाचे महत्त्व खूप आहे. टोनी प्रिमियर लिगच्या खेळाडुंना शुभेच्छा देण्यासाठी शिवसेनेचे युवाप्रमुख आदित्य ठाकरेंनीही हजेरी लावली होती. तर ब्राईट आऊट डोर मिडियाचे संचालक योगेश लाखानी यांनी देखील उपस्थिती दर्शवून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

संबंधित विषय
ताज्या बातम्या