SHARE

ओबीनो जीएमएएए अॅन्युअल स्विमिंग स्पर्धेत त्रिशा कारखानीस आणि नील रॉय या दोघांनी विजय मिळवला आहे. चेंबूरच्या टाटा पॉवर स्विमिंग पूल येथे ही स्पर्धा रंगली होती.

मुलांच्या नील रॉय याने 35 गुण मिळवत विजय साकार केला, तर मुलींच्या गटात त्रिशाने 21 गुण मिळवत दोन वेळा विक्रम मोडीत काढला. लोअर गटात ओझोन स्विमिंगमध्ये अनन्या नायक आणि पोलिस स्विमिंगमध्ये अर्चित मोरवेकर यांनी विजय मिळवला. तर, याच दरम्यान 6 वर्ष वयोगटात गोरेगाव स्पोर्ट्स क्लबच्या विदान गुप्ता आणि एमजीएमओच्या अदिती हरयान यांनी विजय मिळवला.

सिनिअर गटात झालेल्या स्पर्धेत त्रिशा आणि नील यांनी चमकादार कामगिरीचे प्रदर्शन केले. या दोघांनीही यावेळी रेकॉर्ड ब्रेक खेळ केला. यापूर्वी अशा प्रकारच्या स्विमिंग स्पर्धेत दोन सुवर्णपदके मिळवलेल्या त्रिशाने यावेळीही सुवर्णपदकाची कमाई केली.हेही वाचा - 

ऑटर्स क्लबतर्फे स्विमिंग स्पर्धेचं आयोजन

मुंबईत 'अंडरवॉटर फेस्टिवल'चा थरार


संबंधित विषय
ताज्या बातम्या