युनियन बँक ऑफ इंडियाने मारली बाजी

 Nariman Point
युनियन बँक ऑफ इंडियाने मारली बाजी
Nariman Point, Mumbai  -  

मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशन लीग 2016-17 च्या एलिट डिव्हिजनच्या सामन्यात युनियन बँक ऑफ इंडियाने पीआईएफए कुलाबा एफसीचा दणदणीत पराभव करत 4-0 ने विजय मिळवला. सोमवारी सकाळी कुपरेज मैदानात हा सामना खेळवण्यात आला

. युनियन बँक ऑफ इंडियाच्या विजयात खारीचा वाटा उचलला तो स्ट्राईकर टायटस अत्तनकर, विनोद पांडे आणि व्हॅलेंटाईन परेरा यांनी. युनियन बँक ऑफ इंडियाच्या संघाने चांगली खेळी करत कुलाबा एफसीला धूळ चारली. शेवटच्या 35 व्या मिनिटाला उत्तनकर याच्यासोबत संघाने चांगली खेळी करत 1-0ची आघाडी घेतली. 

एकीकडे युनियन बँक ऑफ इंडियाचा संघ चांगली कामगिरी करत होता. तर दुसरीकडे कुलाबा संघ सपशेल अपयशी ठरत होता. याचाचा फायदा घेत युनियन बँक ऑफ इंडियाच्या संघाने कुलाबा संघावर दबाव टाकला. दरम्यान, 85 व्या मिनिटाला परेराने चौथा गोल करत संघाला विजय मिळवून दिला. दरम्यान तरुण स्पोर्टिंग क्लब आणि चार्टर रुखी समाज यांच्यातील सामना ड्रॉ झाला.

Loading Comments