Advertisement

वाॅटरपोलो लीगमध्ये पश्चिम रेल्वेची बाजी


वाॅटरपोलो लीगमध्ये पश्चिम रेल्वेची बाजी
SHARES

गतविजेत्या पश्चिम रेल्वेनं शानदार कामगिरी करत सेंट्रल रेल्वेचा ९-४ असा धुव्वा उडवून जीएमएएए वाॅटरपोलो लीगचे विजेतेपद कायम राखले. पीएम हिंदू बाथ पूलमध्ये रंगलेल्या या लीगमध्ये महिलांमध्ये मोनिका मोझेस अाणि सायली कवळे यांच्या अप्रतिम कामगिरीमुळे एमजीएमअो म्हणजेच महात्मा गांधी मेमोरियल स्विमिंग पूल संघाने यजमान पीएम हिंदू बाथ पूल संघाचा ७-१ असा पराभव करून महिला लीगचे जेतेपद पटकावले.


कुंडे बंधूंची कमाल

पुरुषांच्या अंतिम फेरीवर पश्चिम रेल्वेच्या खेळाडूंनी पूर्णपणे वर्चस्व गाजवले. सेंट्रल रेल्वेच्या खेळाडूंना त्यांनी डोकं वर काढण्याचीही संधी दिली नाही. संपूर्ण खेळावर पश्चिम रेल्वेचाच दबदबा राहिला. विजेत्यांकडून अक्षय अाणि अश्विन या कुंडे बंधूनी सुरेख खेळ करत पश्चिम रेल्वेला सर्वाधिक गुण मिळवून दिले. त्यांना अाशिष अंबाळकर, अर्जुन कवळे अाणि सारंग वैद्य यांची सुरेख साथ लाभली. सेंट्रल बँकेकडून उदय उडेतकर अाणि अादर्श यांनी कडवा प्रतिकार केला.


हे ठरले सर्वोत्तम

पश्चिम रेल्वेकडून अक्षय कुंडे सर्वोत्तम खेळाडू ठरला. त्याला पुरुष गटातील सर्वात व्हॅल्यूएबल प्लेयर पुरस्काराने गौरविण्यात अाले. महिला गटात हा मान एमजीएमअोच्या सायली कवळे हिने पटकावला.


हेही वाचा -

कसोटीतही अोपनिंगला येण्यास रोहित शर्मा सज्ज

अजित अागरकरची निवड समितीतून हकालपट्टी?



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा