वर्ल्डकप विजेते कॅरमपटू क्रीडामंत्र्यांच्या हस्ते सन्मानित


वर्ल्डकप विजेते कॅरमपटू क्रीडामंत्र्यांच्या हस्ते सन्मानित
SHARES

दक्षिण कोरिया येथे झालेल्या पाचव्या विश्व अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत भारताने तब्बल ५ सुवर्ण, ५ रौप्य व २ कांस्यपदकांची कमाई केली. या भारतीय संघात निम्म्याहून अधिक कॅरमपटू हे महाराष्ट्रातील अाणि विशेष करून मुंबईतील होते. मुंबईच्या प्रशांत मोरेने पुरुषांच्या एकेरीत विश्वविजेतेपदाला गवसणी घातली. त्याचबरोबर अायसीएफ चषक विजेते रियाझ अकबर अली, काजल कुमारी अाणि अांतरराष्ट्रीय कॅरमपटू अायेशा मोहम्मद या चौघांनी मिळून एकूण ४ सुवर्ण, ४ रौप्य अाणि एका कांस्यपदकाची कमाई केली. वर्ल्डकप विजेत्या खेळाडूंनी मंगळवारी राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. विनोद तावडे यांनी खेळाडूंना सन्मानित करतानाच भविष्यात कॅरम खेळासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे अाश्वासन दिले.


राज्य असोसिएशनकडूनही गौरव

मंगळवारी संध्याकाळी याच खेळाडूंना महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या वतीने वरळी स्पोर्टस क्लब येथे विशेष सत्कार करण्यात अाला. यावेळी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष शिवकुमार लाड, सचिव अरुण केदार, कार्याध्यक्ष जितूभाई शाह यांच्यासह अनेक मान्यवर अाणि कॅरमप्रेमी उपस्थित होते.


महाराष्ट्राच्या या खेळाडूंची छाप

वर्ल्डकप कॅरम स्पर्धेत महाराष्ट्राच्या चार खेळाडूंनी पदके मिळवली. प्रशांत मोरेने पुरुष एकेरीचे सुवर्ण तर रियाझ अकबर अलीने रौप्यपदक पटकावले. महिलांच्या एकेरीत काजल कुमारीने रौप्य तर अायेशा मोहम्मदने कांस्यपदकापर्यंत झेप घेतली. पुरुष सांघिक गटात रौप्य अाणि महिला गटात सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारताच्या संघात महाराष्ट्राच्या कॅरमपटूंनी मोलाची भूमिका बजावली होती.


हेही वाचा -

वर्ल्डकप विजेत्या कॅरमपटूंचा मंगळवारी सत्कार

वर्ल्डकप कॅरममध्ये प्रशांत मोरे, काजल कुमारीची कमालसंबंधित विषय