Advertisement

वर्ल्डकप विजेत्या कॅरमपटूंचा मंगळवारी सत्कार


वर्ल्डकप विजेत्या कॅरमपटूंचा मंगळवारी सत्कार
SHARES

सोंगम स्पोर्टस टाऊन, दक्षिण कोरिया येथे झालेल्या पाचव्या वर्ल्डकप कॅरम स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन करत तब्बल ५ सुवर्ण, ५ रौप्य अाणि २ कांस्यपदकांची कमाई केली. या स्पर्धेत प्रशांत मोरेने तर एस. अपूर्वा हिने अनुक्रमे पुरुष अाणि महिला गटाचे विजेतेपद पटकावले होते. महाराष्ट्राच्या अनेक खेळाडूंनी या स्पर्धेत छाप पाडली. महाराष्ट्रातील खेळाडूंचा विशेष सत्कार महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या वतीने केला जाणार अाहे. मंगळवार ११ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजता वरळी स्पोर्टस क्लब, अादर्श नगर, प्रभादेवी येथे खेळाडूंना सन्मानित करण्यात येणार अाहे.


महाराष्ट्राच्या या खेळाडूंची छाप

या स्पर्धेत भारताच्या पुरुष संघातील चार तर महिला संघातील चार कॅरमपटूंनी पदके मिळवली. या पदक विजेत्या खेळाडूंमध्ये महाराष्ट्राच्या २ पुरुष अाणि २ महिला खेळाडूंचा समावेश होता. प्रशांत मोरेने पुरुषांच्या एकेरीचे रौप्यपदक तर रियाझ अकबर अलीने रौप्यपदक पटकावले. महिलांच्या एकेरीत काजल कुमारीला रौप्यपदकावर तर अायेशा मोहम्मदला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.


सांघिक गटातही चमक

पुरुष सांघिक गटात भारतीय खेळाडूंनी रौप्य तर महिला सांघिक गटात सुवर्णपदकाची कमाई केली. या पदकविजेत्या खेळाडूंमध्ये महाराष्ट्राच्या कॅरमपटूंचाही मोलाचा वाटा होता. विशेष म्हणजे २०१६ साली विश्व अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपद पटकावणाऱ्या प्रशांत मोरेने वर्ल्डकप जिंकून अांतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सातत्य राखले अाहे.


हेही वाचा -

वर्ल्डकप कॅरममध्ये प्रशांत मोरे, काजल कुमारीची कमाल

हाॅकी वर्ल्डकप जिंकण्याची भारतीय संघात क्षमता - धनराज पिल्ले

मुंबईत रंगणार इंडो इंटरनॅशनल प्रीमिअर कबड्डी लीगसंबंधित विषय
Advertisement