यश, अरविंद, पल्लवी, राशी यांना गट विजेतेपद

  Parel
  यश, अरविंद, पल्लवी, राशी यांना गट विजेतेपद
  मुंबई  -  

  आयडियल स्पोर्ट्स अॅकॅडेमीतर्फे सोमवारी मुंबईचे माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे यांच्या गौरवार्थ जलद बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत 8 वर्षांखालील मुलांमध्ये यश राणे (5 गुण), मुलींमध्ये पल्लवी यादव (4 गुण) तर 10 वर्षांखालील मुलांमध्ये अरविंद अय्यर (5 गुण) व मुलींमध्ये राशी चौहान (5 गुण) यांनी गट विजेतेपद पटकावले. मुंबईचे माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे यांच्या उपस्थितीत विजेत्यांना पुरस्कार देण्यात आला.

  8 वर्षांखालील गटामध्ये स्वीस लीगच्या निर्णायक पाचव्या फेरीत यश राणेने (4 गुण) अनिकेत शिंदेच्या (4 गुण) राजाला नमवत पाचवा गुण वसूल केला आणि अपराजित राहून मुलांमध्ये प्रथम क्रमांकावर झेप घेतली. धैर्या मलिकने द्वितीय तर अनिकेत शिंदेने तृतीय पुरस्कार मिळवला.

  तर मुलींमध्ये अपराजित पल्लवी यादवची (4 गुण) विजयी दौड मृगया गोतमरेने (2.5 गुण) साखळी पाचव्या फेरीत रोखूनही पल्लवीने गट विजेतेपद राखले. या गटात विहा जैनने द्वितीय, मृगया गोतमरेने तृतीय क्रमांक पटकाविला.


  हेही वाचा

  जलद बुद्धिबळ स्पर्धेत अलैना, वेदांतची विजयी सलामी


  दहा वर्षांखालील गटामध्ये पाचव्या फेरीत अपराजित अरविंद अय्यरने (4 गुण) आरव अय्यरच्या (4 गुण) राजाला जेरीस आणून पाचव्या गुणाची कमाई केली आणि गट विजेतेपद पटकावले. या गटात ध्रुव व हळदणकरने द्वितीय तर विक्रमने तृतीय क्रमांक पटकावला.

  तर, मुलींमध्ये गट विजेतेपद पटकावताना अपराजित राशी चौहानने (4 गुण) स्वराली भागवतचा (3 गुण) पराभव करून सर्वाधिक 5 गुण घेतले. या गटात अनन्या दळवीने द्वितीय, ओजस्विनी ओकने तृतीय पुरस्कार मिळवला. या स्पर्धेत मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, बलसाड-गुजरात आदी जिल्ह्यातील 159 खेळाडूंच्या रंगतदार अशा लढती परेल येथील आरएमएमएस सभागृहात पहायला मिळाल्या.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.