Advertisement

युवा बुद्धिबळपटू निवानचा नितीन गडकरींच्या हस्ते सन्मान


युवा बुद्धिबळपटू निवानचा नितीन गडकरींच्या हस्ते सन्मान
SHARES

छोट्याशा वयातच बुद्धिबळातील ६४ घरांच्या क्षितिजाला गवसणी घालण्याचे स्वप्न बाळगणारा भारतातील सर्वात युवा मानांकित बुद्धिबळपटू निवान खांधाडिया याचा मुंबईत झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात अाला. सहा वर्षांच्या निवानला गडकरी यांनी शुभेच्छा दिल्या अाहेत.


बुद्धिबळाच्या खेळात तू केलेली कामगिरी उल्लेखनीय अाहे. यापुढेही कठोर मेहनत घेऊन तू चांगली कामगिरी करावीस, यासाठी तुला शुभेच्छा. खडतर मेहनतीद्वारेच तुझे भारतातील अाणि जगातील सर्वात युवा ग्रँडमास्टर होण्याचे स्वप्न पूर्ण होईल, यासाठी तुला शुभेच्छा
- नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री


निवानची कारकीर्द

पुण्यातील मगरपट्टा येथील विबग्योर हायस्कूलमध्ये सिनियर केजीत शिकणाऱ्या निवानने वयाच्या सहाव्या वर्षीच ११३७ एलो रेटिंग गुणांची कमाई केली अाहे. वर्ल्ड चेस फेडसेशनने मे २०१८ मध्ये जाहीर केलेल्या फिडे क्रमवारीनुसार तो सध्या जगात १०व्या क्रमांकावर अाहे. नुकत्याच अल्बानिया येथे झालेल्या वर्ल्ड स्कूल चेस चॅम्पियनशिप स्पर्धेत तो भारतीय पथकातील सर्वात युवा बुद्धिबळपटू होता.


चौथ्या वर्षी बुद्धिबळाला सुरुवात

चार वर्षांचा असतानाच निवानने वडील राथिन यांच्याकडून बुद्धिबळाचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. चाली रचण्याचे अाणि डावपेच अाखण्याचे तंत्र लवकर अात्मसात केल्यानंतर निवान सध्या साऊथ मुंबई चेस अकॅडमीच्या विश्वनाथ शांडिल्य यांच्याकडून प्रशिक्षण घेत अाहे. दरदिवशी ४-५ तास बुद्धिबळाचा सराव करणाऱ्या निवाननं अातापर्यंत राज्य अाणि राष्ट्रीय स्तरावर पदकांची लयलूट केली अाहे.


हेही वाचा -

हार्दिक पंड्याला मँचेस्टर युनायटेडकडून मिळालं 'हे' गिफ्ट!

मोंगोलियाची बाखुयाग मुंगूनटूल ठरली महिला बुद्धिबळाची चॅम्पियन!

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा