Advertisement

ठाण्याच्या झैद अहमदने पटकावले राज्य कॅरमचे पहिलेवहिले विजेतेपद


ठाण्याच्या झैद अहमदने पटकावले राज्य कॅरमचे पहिलेवहिले विजेतेपद
SHARES

ठाण्याच्या झैद अहमदने माजी विश्वविजेत्या योगेश परदेशीला २५ ११, २५-११ असे सरळ दोन सेटमध्ये पराभूत करून सर्वानाच आश्चर्यचकित केले अाणि दुसऱ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या वर्षी तीन वेळा अंतिम फेरीत मजल मारत झैद अहमदने पहिल्यावहिल्या राज्य विजेतेपदाला गवसणी घातली.


उपांत्य फेरीच्या थरारक लढती

मुलुंड जिमखाना अायोजित दुसऱ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत उपांत्य लढतीमध्ये झैदने पुण्याच्या गणेश तावरेचे अाव्हान २५-८, ८-२५, २५-० असे परतवून लावले होते. योगेश परदेशीने मुंबईच्या जितेंद्र काळेला २५-११, १६-१४, २५-२४ असे पराभूत केले होते.


महिलांमध्ये काजल कुमारी विजेती

महिला गटातील अंतिम सामन्यात मुंबईच्या काजल कुमारीने मुंबईच्याच आयेशा मोहम्मद हिचा २२-१८, ०-२५, २५-८ असा तीन सेटमध्ये फडशा पाडला. पहिला सेट आयेशाने गमाविल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये तिने काजलला भोपळाही फोडू दिला नव्हता. परंतु आपल्या आक्रमक खेळाच्या जोरावर काजलने तिसरा सेट जिंकला.


हेही वाचा -

मुलुंड जिमखाना राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत लाखोंची बक्षिसं

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा