Advertisement

मुंबईकरांशी संवाद साधण्यासाठी पालिका चॅटबोट फीचर आणणार

बृहन्मुंबई महानगरपालिकेनं (BMC) चॅटबोट ही नवी सुविधा सुरू करत आहे.

मुंबईकरांशी संवाद साधण्यासाठी पालिका चॅटबोट फीचर आणणार
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिकेनं (BMC) चॅटबोट ही नवी सुविधा सुरू करत आहे. चॅटबॉट सुरू करण्याचा निर्णय नागरिकांशी सहज संवाद साधण्यासाठी आणि तक्रारीचं निवारण करण्यासाठी घेण्यात आला आहे. हा चॅटबोट आपत्ती व्यवस्थापन मोबाईल ऍप्लिकेशनचा एक भाग असेल.

सध्या, विभागाला ट्विटरवर आणि त्याच्या हेल्पलाइन नंबरवर कॉलद्वारे तक्रारी प्राप्त होतात. मुंबईकरांशी संवाद सुधारण्याचा पालिकेचा मानस आहे. चॅटबोटवर येणाऱ्या तक्रारी तपासण्यात येतील. महत्त्वाच्या तक्रारींना प्रथम प्राधान्य देण्यात येईल.

आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रभारी अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले की, विभागाचे प्रशिक्षित कर्मचारी वापरकर्त्यांशी गप्पा मारतील. ते स्वयंचलित यंत्रणा ठेवतील ज्यामुळे संबंधित यंत्रणांना लगेच अलर्ट मिळेल.

सध्या, चॅटबोट विकासाच्या अंतिम टप्प्यात आहे. एका महिन्यात हा चॅटबोट सुरू होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतरच सर्वसामान्य हे चॅटबोट वापरू शकतील. पण ही सुविधा वापरण्यासाठी नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन अॅप डाउनलोड करावं लागेल.

या चॅटबोटद्वारे नागरिक त्यांच्या समस्याच नाही तर त्यांच्या मागण्या, तक्रारी नोदवू शकतात. यात इनबिल्ट स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (SOP) आहे. एसओपी रस्ते, हायड्रॉलिक, कचरा संकलन, स्ट्रॉम वॉटर ड्रेन यासंबंधीच्या तक्रारींसाठी असेल. चॅटबोट तक्रारींना प्रतिसाद देईल आणि संवादाच्या प्रत्येक टप्प्यावर सेवा प्रदान करेल.Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा