गुगल ठप्प

सकाळी-सकाळी संगणक उघडणाऱ्या जगभरातील कोट्यवधी नेटकरांना आज धक्का बसला आहे. तांत्रिक अडचणींमुळं गुगलच्या सेवेत अडथळा येत आहे. पाठवलेले ई-मेल समोरच्याला मिळत नाहीत. मिळालेच तर डाउनलोड होत नाहीत. त्यामुळं युजर्स हैराण झाले असून सोशल मीडियावर तक्रारींचा पाऊस पडला आहे.