गावं होणार डिजिटल

 BEST depot
गावं होणार डिजिटल
गावं होणार डिजिटल
See all

कुलाबा - राज्यातील प्रत्येक गाव डिजिटल करण्याचं सरकारचं नियोजन असून, महाराष्ट्र हे डिजिटल इंडियाच्या अंमलबजावणीत अग्रेसर राज्य ठरेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. सिस्कोतर्फे हॉटेल ताजमध्ये आयोजित 'इनॅब्लिंग डिजिटल इंडिया अँड मेक इन इंडिया-इन पार्टनरशिप विथ महाराष्ट्र' या कार्यक्रमात ते बोलत होते. सिस्कोच्या पुणे येथील प्रकल्पाचे व्हर्च्युअली उद्घाटन या वेळी झालं. नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत, केंद्रीय माहिती तंत्रज्ञान सचिव अरुणा सुंदरराजन, सिस्को सिस्टिमचे मुख्य कार्यकारी अधिकारी चक रॉबिन्स, सिस्को इंडियाचे अध्यक्ष दिनेश मलकानी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

Loading Comments