DR OPD अॅप देणार केइएमची माहिती

 BMC office building
DR OPD अॅप देणार केइएमची माहिती
DR OPD अॅप देणार केइएमची माहिती
DR OPD अॅप देणार केइएमची माहिती
See all

परळ - येथील केईएम रुग्णालयाच्या 91 व्या वर्धापनदिनी रुग्णालयाची इत्थंभूत माहिती देणाऱ्या DR OPD या नव्या अ‍ॅपचे उदघाटन महानगर पालिका सहाय्यक आयुक्त सुनील धामणे यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. यावेळी डॉ. जीबी परुळेकर, माजी अधिष्ठाता डॉ. निलीमा क्षिरसागर, वैदयकीय संचालक आणि केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे आदी मान्यवर उपस्थितीत होते.

सेवा फाऊंडेशनचे प्रमोद वराडकर आणि विकास वराडकर या बंधूंनी हे DR OPD अ‍ॅप तयार केले आहे. लवकरच नायर, सायन तसेच कुपर रुग्णालयाची माहिती यात समाविष्ट करण्यात येणार असल्याचे सेवा फाऊंडेशच्या प्रमोद वराडकर यांनी सांगितले.

या अॅपमध्ये सर्व रुग्णालतातील ओपीडी कधी, कुठे आणि कीती वाजता उपलब्ध आहेत याची माहिती तर मिळतेच पण एखादा वॉर्ड, एक्स रे, रक्त तपासण्या रुग्णालयात कुठे आहेत, हेही सहजपणे शोधता येणार आहे. तसेच रुग्णांना मदत करणाऱ्या संस्था, ब्लड बँक यांचे नंबर, डायलिसीस सेंटर, राहण्याची सोय कुठे आहे याचीही माहिती या अ‍ॅपमध्ये मिळणार आहे. हे अ‍ॅप रुग्णालय प्रशासन, डॉक्टर आणि रुग्ण या दोघांमधला महत्त्वाचा दुवा म्हणून कार्य करणार आहे. या अ‍ॅपमुळे रुग्ण मार्गदर्शनाचे व्हिडियो सर्वांपर्यंत पोहोचणे देखील सोपे होईल. विशेष म्हणजे आतापर्यंत सहा हजार नागरिकांनी हे अॅप डाउनलोड केले आहे. दरम्यान आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वसामान्यांपर्यंत अॅपच्या माध्यमातून माहिती पोहोचविणाऱ्या फाऊंडेशनच्या प्रमोद वराडकर आणि विकास वराडकर यांचा सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी गौरव केला.

Loading Comments