मेट्रो स्थानकांच्या सर्वेक्षणासाठी ड्रोनचा आधार

 Pali Hill
मेट्रो स्थानकांच्या सर्वेक्षणासाठी ड्रोनचा आधार

मुंबई – वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली मार्गावरील मेट्रो स्थानकांच्या सर्वेक्षणासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करण्यात येणार आहे. एमएमआरडीएतल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं  ही माहिती दिलीय.

मेट्रो स्थानकांचं काम हे प्रकल्पातलं अत्यंत महत्त्वाचं आणि अवघड काम आहे. मेट्रो स्थानकाच्या बांधकामासाठीच सर्वाधिक विस्थापन होतं. झाड तोडावी लागतात. त्यामुळे विस्थापन-पुनर्वसन आणि वृक्षतोडीचं सर्वेक्षण योग्य प्रकारे आणि प्रकल्प सुरू होण्याआधीच होणं आवश्यक आहे. म्हणूनच एमएमआरडीएनं ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करण्याचं ठरवलंय. त्यामुळे त्या ठिकाणी किती बांधकामं आहेत, किती झाडं आहेत, जागांचं सीमांकन कसं आहे याची अचूक माहिती मिळेल. ड्रोन कॅमेऱ्याद्वारे करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणानुसार मेट्रो स्थानकाचं थ्री डी मॉडेल तयार करण्यात येईल. या थ्री डी मॉडेलप्रमाणेच मेट्रो स्थानकाचं बांधकाम करण्यात येईल.

दरम्यान डीएन नगर-मानखुर्द मेट्रो-२ मेट्रो सर्वेक्षणासाठीही ड्रोनचाच आधार घेण्यात येणार असल्याचंही या अधिकाऱ्यानं स्पष्ट केलंय.

Loading Comments