Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,17,121
Recovered:
56,54,003
Deaths:
1,12,696
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,390
575
Maharashtra
1,47,354
9,350

फेसबुकवर बनवा तुमचा अॅनिमेटेड अवतार

फेसबुकअॅपच्या लेटेस्ट व्हर्जनमध्ये अवतार्स Avatars नावाचे नवीन फिचर लाँच करण्यात आलं आहे.

फेसबुकवर बनवा तुमचा अॅनिमेटेड अवतार
SHARES

सोशल मीडियात अग्रेसर असलेल्या फेसबुकनं आपल्या युजर्ससाठी एक खास फिचर लाँच केलं आहे. फेसबुकचचे युजर्स या फिचर्सच्या मदतीनं स्वत:चे व्हर्च्युअल कार्टून किंवा अनिमेटेड कॅरेक्टर बनवू शकतात. फेसबुकअॅपच्या लेटेस्ट व्हर्जनमध्ये अवतार्स Avatars नावाचे नवीन फिचर लाँच करण्यात आलं आहे.

भारतीय युजर्सच्या दृष्टीकोनातून हे फिचर कस्टमाईज करण्यात आलं आहे. फेसबुकच्या नवीन फिचर्सच्या मदतीनं तुम्ही स्वत:चे अनिमेटेड अवतार्सचे स्टिकर्स बनवू शकता. तुम्ही बनवलेले हे स्टिकर्स मेसेंजरवर पाठवू शकता. याचा वापर कमेंट्समध्येही करता येऊ शकतो. यात अनेक चेहरे, हेअर स्टाईल आणि आऊटफिटला हे नवीन फिचर सपोर्ट करतं.

तुम्हाला देखील स्वत:चे स्टिकर्स बनवायचे असतील तर, सर्वप्रथम फेसबुक आणि मेसेंजर अॅप अपडेट करावं लागेल. हे फिचर अॅप्सच्या Lite  व्हर्जनवर काम करणार नाही हे लक्षात ठेवा. व्हर्जन अपडेट केल्यानंतर अवतार क्रिएट करण्याचा पर्याय उपलब्ध होईल. कमेंट सेक्सनमध्ये स्मायली आयकॉनवर टॅप केल्यानंतर Make Your Avatar असा पर्याय उपलब्ध होईल.  हेही वाचा

व्हायरल होणाऱ्या फोटोंची गुगल 'अशी' करणार पडताळणी

आता ट्विटरवर करा ऑडिओ ट्विट

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा