Advertisement

आता ट्विटरवर करा ऑडिओ ट्विट

ट्विटरवर व्हॉइस रेकॉर्ड करुन ऑडिओ ट्विट करु शकणार आहात.

आता ट्विटरवर करा ऑडिओ ट्विट
SHARES

ट्विटर आपल्या युजर्ससाठी काही ना काही नवे फिचर्स आणत असते. आता देखील ट्विटरनं एक नवीन फिचर आणले आहे. आता तुम्ही ट्विटरवर व्हॉइस रेकॉर्ड करुन ऑडिओ ट्विट करु शकणार आहात. हे फीचर सध्या मर्यादित युजर्ससाठी उपलब्ध आहे.

१४० सेकंदांपर्यंत ऑडिओ रेकॉर्ड करुन व्हॉइस ट्विटमध्ये युजर्स ट्विट करु शकतो. ही मर्यादा जर ओलांडली तर नवीन व्हॉइस नोट सुरू होईल. ट्विटरवर सध्या मेसेज लिहून ट्विट करण्यासाठी 280 शब्दांची मर्यादा आहे. पण व्हॉइस ट्विट फीचरमध्ये व्हॉइस नोटला नेहमीच्या टेक्स्ट ट्विटसोबत अ‍ॅड करता येईल. म्हणजेच एकाच ट्विटमध्ये टेक्स्ट आणि व्हॉइस नोट दोन्ही वापरता येईल.

iOS युजर्सना व्हॉइस ट्विट करण्यासाठी न्यू पोस्टवर टॅप करावं लागेल. तिथं कॅमेऱ्याच्या बाजूला असलेल्या ऑडिओ रेकॉर्ड पर्यायावर टॅप केल्यास युजरला व्हॉइस नोट रेकॉर्ड करता येईल. त्यानंतर ‘डन’ बटणावर टॅप करुन शेअर करता येईल.

असून iOS डिव्हाइससाठी हे फीचर कंपनीनं रोलआउट करण्यास सुरूवात केली आहे. हे फीचर येत्या काही आठवड्यांमध्ये सर्व iOS डिव्हाइसवर उपलब्ध होईल. हे फीचर अँड्रॉइड स्मार्टफोनसाठी केव्हापर्यंत उपलब्ध होईल याबाबत अद्याप कंपनीनं माहिती दिलेली नाही. पण, हे फीचर लवकरच अँड्रॉइड फोनसाठीही उपलब्ध होण्याची शक्यता आहे.



हेही वाचा

लॅपटॉप, टॅबच्या मागणीत प्रचंड वाढ

झूमला करा टाटा, भारतीय कंपनीला बोला 'से नमस्ते'

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा