Advertisement

आता Google Map सांगणार कोरोना हॉटस्पॉट

कोणत्या परिसरात रुग्ण वाढले आहेत याची माहिती द्यायला नवं फीचर Google Map नं सुरू केलं आहे.

आता Google Map सांगणार कोरोना हॉटस्पॉट
SHARES

Google Map आता कोरोना हॉटस्पॉट (Coronavirus hotspots) पण सांगणार आहे. तुम्ही जात असलेल्या परिसरात कोरोनारुग्णांची संख्या वाढलेली आहे का? हे Google सांगू शकेल. कोणत्या परिसरात रुग्ण वाढले आहेत याची माहिती द्यायला नवं फीचर Google Map नं सुरू केलं आहे.

Unlock ची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर धोका असूनही अनेक जण कामासाठी बाहेर पडत आहेत. आपण ज्या भागात जातोय तिथं कोरोना रुग्णांची संख्या किती आहे? ती वाढलेली आहे का? हे सांगायला Google Map ने एक नवी संकल्पना विकसित केली आहे. कोरोना हॉटस्पॉटची माहिती गूगल मॅपवर मिळणार आहे.

Google Map App च्या वरच्या बाजूला असलेल्या Covid 19 या पर्यायावर क्लिक केल्यावर एक लाख लोकसंख्येमागे किती रुग्ण विशिष्ट भागात आहेत, याची माहिती मिळेल. यासह विशिष्ट भागात किती रुग्ण वाढले किती कमी झाले ही माहितीही मिळेल.

युजर्सपर्यंत सर्व माहिती पोहचवण्यासाठी बाल्टीमोरच्या जॉन्स हॉपकिन्स रुग्णालय, न्यूयॉर्क टाईम्स, विकिपीडीया यासारख्या स्त्रोतांकडून हा सर्व डेटा उपलब्ध झाला आहे. यासह जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) माहिती घेण्यात आली आहे.

कोरोना काळात Google Map नी काही सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. Google Map नं आधी कोरोना साथीच्या संदर्भातील माहिती देणारी टूल्स उपलब्ध करून दिली आहेत. त्यात कुठल्या भागात गर्दी जास्त आहे हे समजतं.

याशिवाय लॉकडाउनमध्ये अत्यावश्यक सेवा कुठे उपलब्ध होतील? याची प्राथमिक माहिती देण्यात आली होती. या सेवा केंद्रांच्या माहितीसाठी राज्य आणि केंद्र सरकारसोबत राहून अधिकाऱ्यांच्या मदतीनं याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यात आली होती. शासकीय यंत्रणेनी उपलब्ध करून दिलेली भोजनाची तसंच निवासाची व्यवस्था लोकांपर्यंत पोहचवण्याचं कार्य या काळात करण्यात आलं.



हेही वाचा

'नमस्ते' म्हणत अ‍ॅपलचे पहिले ऑनलाईन स्टोअर लाँच

PUB G मोबाईल गेम भारतात पुन्हा होऊ शकतो  लाँच

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा