Advertisement

PUB G मोबाईल गेम भारतात पुन्हा होऊ शकतो लॉन्च

PUBG या गेमच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. PUB G मोबाइल गेम भारतात परत येऊ शकेल.

PUB G मोबाईल गेम भारतात पुन्हा होऊ शकतो लॉन्च
SHARES

PUBG या गेमच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.  PUB G मोबाइल गेम भारतात परत येऊ शकेल. कोरीयाचा PUB G कॉर्पोरेशन भारतात PUB G च्या पूर्ण संचालनाची जबाबदारी चीनच्या Tencent Games कडून घेत आहे.

PUB G कॉर्पोरेशननं सोमवारी यासंदर्भात पूर्ण माहिती दिली. २ सप्टेंबर रोजी केंद्र सरकारनं देशातील PUB G मोबाइलसह ११८ चिनी अॅप्सवर बंदी घातली होती. त्यानंतर PUB G कॉर्पोरेशननं हा निर्णय घेतला आहे.

बंदीनंतर, PUB G मोबाइल बनवणारी कंपनी  Tencent Games नं सांगितलं की, भारतात त्यांचे अॅप उपलब्ध होणार की नाही हे सुनिश्चित करण्यासाठी ते भारतीय अधिकाऱ्यांशी बोलत आहेत.

त्याच वेळी, आता या बॅटल रॉयल गेमचे विकसक, PUB G कॉर्पोरेशननं Tencent Games कडून संचालनाची जबाबदारी घेण्याचा निर्णय घेतला आहे. PUB G कॉर्पोरेशननं निवेदनात म्हटलं आहे की, भारतातील PUB G खेळाची संपूर्ण जबाबदारी ते स्वत: घेतली.

याचाच अर्थ असा की, भारतातील PUBG Mobileवरील Tencent Gamesचे कंट्रोल संपुष्टात आणले जाईल आणि आता याची जबाबदारी PUBG कॉर्पोरेशन घेईल. मूळ दक्षिण कोरियातील गेमिंग कंपनी आता जबाबदारी स्वीकारत आहे आणि असे झाल्यास देशातील PUBG वरील बंदी लवकरच काढून टाकली जाऊ शकते.

PUB G कॉर्पोरेशन ही दक्षिण कोरियाची व्हिडिओ गेम कंपनी क्राफ्टन गेम युनियनची सहाय्यक कंपनी आहे. ते PUBG पीसी, PUBG PS4 आणि PUBG Xbox चे विकसक आणि प्रकाशक आहेत. पबजी मोबाइल आणि पबजी मोबाइल लाइटचा परवाना चीनच्या Tencent Games कडे आहे. पब मोबाइल आणि पब मोबाईल लाइट पीयूबीजी कॉर्पोरेशन आणि Tencent Games यांनी संयुक्तपणे तयार केले आहेत.

PUBG कॉर्पोरेशन येत्या काळात भारतात स्वतः PUBG अनुभव देण्याच्या तयारीत आहे. PUBG मोबाइल हे Playrunknown’s Battlegrounds ची मोबाइल आवृत्ती आहे. हा गेम दक्षिण कोरियन गेमिंग कंपनीने विकसित केला आहे.

२ सप्टेंबर रोजी केंद्र सरकारनं देशातील PUB G मोबाइलसह ११८ चिनी अॅप्सवर बंदी घातली होती. राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला देत या अॅप्सवर केंद्रानं बंदी घातली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं असा अहवाल दिला होता की अँड्रॉइड आणि आयओएस प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेले हे मोबाइल अॅप्स वापरकर्त्यांचा डेटा चोरत आहेत आणि हा डेटा देशाबाहेरील सर्व्हरवर बेकायदेशीरपणे पाठवत आहेत.



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा