Advertisement

'नमस्ते' म्हणत अ‍ॅपलचे पहिले ऑनलाईन स्टोअर लाँच

दिग्गज टेक कंपनी अ‍ॅपलनं अखेर भारतातील आपलं पहिलं ऑनलाईन स्टोअर लाँच केलं आहे.

'नमस्ते' म्हणत अ‍ॅपलचे पहिले ऑनलाईन स्टोअर लाँच
SHARES

भारतात वाढते ऑनलाईन शॉपिंगचे प्रमाण पाहता दिग्गज टेक कंपनी अ‍ॅपलनं अखेर भारतातील आपलं पहिलं ऑनलाईन स्टोअर लाँच केलं आहे. अ‍ॅपलच्या ऑनलाईन स्टोअरची वेबसाईट https://www.apple.com/in/shop आहे.

आता ग्राहक अ‍ॅपलचे उत्पादन फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉनच्या ऐवजी थेट अ‍ॅपलच्या स्टोरवरून खरेदी करू शकतील. या स्टोरवरून कंपनीचे आयफोन, आयपॅड, अ‍ॅपल वॉच, मॅकूबक आणि अ‍ॅपल टिव्ही सारखे प्रोडक्ट खरेदी करता येतील. या प्रोडक्ट्सची डिलिव्हरी कॉन्टॅक्टलेस असेल. पेमेंटसाठी सर्व पर्याय असतील.

अ‍ॅपलच्या ऑनलाईन स्टोरवर ग्राहक जुन्या फोनला एक्सचेंज करून नवीन फोन देखील खरेदी करू शकतात. ऑनलाईन स्टोरवर एक्सचेंज करता येणाऱ्या फोनची यादी देखील देण्यात आली आहे. समजा तुम्ही आयफोन एक्सएस मॅक्सला एक्सचेंज करत असाल तर तुम्हाला या फोनची एक्सचेंज वॅल्यू जवळपास ३५ हजार रुपयांपर्यंत मिळेल. अ‍ॅपल स्टोरवरून खरेदी केलेल्या कोणत्याही प्रोडक्टची डिलिव्हरी ७२ तासांच्या आत होईल.

अ‍ॅपलचे प्रोडक्ट खरेदी करण्यासोबत तज्ञ तुम्हाला त्या वस्तूची संपुर्ण माहिती देखील देतील. याशिवाय हिंदी आणि इंग्रजी भाषेत कस्टमर केअरची सुविधा मिळेल. अ‍ॅपलच्या प्रोडक्ट्ससोबत अ‍ॅपलकेअर+ सुविधा देखील घेऊ शकता. याद्वारे कोणत्याही वस्तूवरील वॉरंटी २ वर्षांपर्यंत वाढेल.



हेही वाचा

PUB G मोबाईल गेम भारतात पुन्हा होऊ शकतो लॉन्च

PUB G बॅननंतर भारतात FAU-G गेमची घोषणा, अक्षय कुमारची ट्विटरवर माहिती

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा