SHARE

मुंबई - रिलायन्स जियोची अनलिमिटेड ऑफर आता काही दिवसांतच संपुष्टात येणार असून एप्रिलपासून जियो वापरावर बिल भरावं लागणार आहे. सध्या कित्येक ग्राहक जियो फ्री असल्याने वापरतात, मात्र आता जियोची ही आॅफर संपणार असल्याने त्याचे ग्राहक कमी होण्याची शक्यता वर्तवली जातेय.

मंगळवारी मुंबईत रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर मुकेश अंबानी यांनी जियोच्या नवीन टेरिफची घोषणा केली. जियो सगळ्यात स्वस्त डेटा टेरिफ देणार असून जियो इतर सर्व्हिस प्रोव्हायडरच्या तुलनेत 20 टक्के अधिक डेटा देणार आहे. तसंच, देशाअंतर्गत फोन कॉल हे फ़्री असणार आहेत. तसंच फ्रि रोमिंगची सुविधा कायम ठेवण्यात आली आहे.

सप्टेंबर महिन्यात लाँच झाल्याच्या 107 दिवसाच्या कालावधीत जियोने 100 मिलियन ग्राहक संख्या पार केल्याचा दावा रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी केलाय.

त्याचबरोबर रिलायन्सने जियो प्राईम देखील सुरु केलं आहे. जियो प्राईमवर 99 रुपयांची वन टाईम पैसे भरून त्यावर फुकटात मार्च 2018 पर्यंत अनलिमिटेड सुविधा मिळणार आहेत. आतापर्यंत जियोच्या ग्राहकांनी 100 करोड जीबीचा डेटा वापरला असून चीन आणि अमेरिकेत वापरण्यात आलेल्या एकूण डेटाहुन हा वापर जास्त असल्याची माहिती मुकेश अंबानी यांनी दिली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या