Advertisement

गुगलबद्दल या '१०' गोष्टी वाचून थक्क व्हाल

काही शोधायचं असेल की आपण लगेच गुगलचा सहारा घेतो. कुणाला माहित नसतं ते गुगलला माहित असतं, असं मानलं जातं. पण सर्वांची माहिती ठेवणाऱ्या या गुगलबद्दल खुप क्वचितच कुणाला माहित असेल.

गुगलबद्दल या '१०' गोष्टी वाचून थक्क व्हाल
SHARES

आपण सर्वच गुगल वापरतो. गुगल वापरतो म्हणजे अगदी त्याच्याशिवाय आपला पत्ता देखील हलत नाही. काही शोधायचं असेल की आपण लगेच गुगलचा सहारा घेतो. कुणाला माहित नसतं ते गुगलला माहित असतं, असं मानलं जातं. पण सर्वांची माहिती ठेवणाऱ्या या गुगलबद्दल खूप क्वचितच कुणाला माहित असेल. आज आम्ही तुम्हाला गुगलबद्दल काही रंजक गोष्टी सांगणार आहोत.


) टायपिंगच्या एका चुकीमुळे गुगल हे नाव उदयास आलं. इंग्लिशमध्ये गुगल नावाचा शब्दच नाही. गणितात वापरण्यात येणारा गोगुल हा मूळ शब्द आहे. पण नाव देताना टायपिंग मिस्टेकमुळे गोगुलऐवजी गुगल झाले. पुढे कंपनीनं गुगल हेच नाव ठेवलं.

) गुगल इंटरनेटवरील सर्वात मोठे सर्च इंजिन आहे. गुगलवर दर सेकंदाला ६० हजारहून अधिक सर्च होतात.

) गुगल जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. अर्थात त्याची कमाई देखील अधिक आहे यात काही शंका नाही. गुगल कंपनी वर्षाला ५००० कोटींची कमाई करते. जाहिरातींच्या माध्यमातून गुगल सर्वाधिक कमाई करते.

) गुगलनं चक्क बकऱ्या नोकरीला ठेवल्या आहेत. विचित्र असलं तरी हे खरं आहे. गुगल ऑफिसच्या समोरील गवत कापण्यासाठी मशीनचा वापर केला जात नाही. तर या कामासाठी चक्क २०० बकऱ्या भाड्यानं घेतल्या आहेत. मशीन वापरून गवत कापल्यानं प्रदूषण होतं. त्यामुळे २०० बकऱ्या गवत खायला ठेवल्या आहेत.

) गुगलनं गेल्या १० वर्षात तब्बल १५६ कंपन्या खरेदी केल्या आहेत. गुगलनं यूट्यूब, अॅण्ड्रॉइड, लिंकडिन, क्रोम, मोटोरोला यांच्यासारख्या अनेक कंपन्या खरेदी केल्या आहेत.

) नासा ही संस्था गुगलच्या हेडक्वार्टरजवळ आहे. त्यामुळे गुगलचे संस्थापक सर्जी ब्रिन आणि लॅरी पेज या दोघांनी तिथलं पार्किंग भाड्यानं घेतलंय.

) गुगलची ४७ देशात ७० ऑफिसेस आहेत. एवढ्या कमी काळात मिळवलेलं हे खुप मोठं यश आहे.

) दर आठवडयाला गुगलमध्ये जवळपास २० हजार लोक नोकरीसाठी अर्ज करतात.

) गुगलमध्ये जवळपास ५० हजार कर्मचारी काम करतात. त्यांना गुगल चांगला पगार देते.

१०) जर एखाद्या गुगल नोकरदाराचा कामादरम्यान मृत्यू झाला तर कंपनी पुढच्या दहा वर्ष त्याच्या परिवाराला अर्धा पगार देते.



हेही वाचा -

सर्वांची खबर ठेवणाऱ्या गुगलच्या या ट्रिक्स जाणून घ्या

IIT फेल तरूणाला गुगलची १.२ कोटींची नोकरी




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा