IIT फेल तरूणाला गुगलची १.२ कोटींची नोकरी

मिरा रोडमध्ये एक असा तरूण आहे जो IIT च्या प्रवेश परीक्षेत फेल झाला. पण हार न मानता त्याने जिद्दीच्या जोरावर इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. एवढंच नाही, तर एका स्पर्धेत सहभागी होऊन त्याने गुगलची १.२ कोटी रुपयांची नोकरी देखील पटकावली.

SHARE

नापास झालं की सर्वकाही संपलं असं मानून नैराश्येत जाणारे असंख्य तरूण परीक्षांच्या कालावधीत आजूबाजूला दिसून येतात. परंतु मिरा रोडमध्ये एक असा तरूण आहे जो IIT च्या प्रवेश परीक्षेत फेल झाला. पण हार न मानता त्याने जिद्दीच्या जोरावर इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. एवढंच नाही, तर एका स्पर्धेत सहभागी होऊन त्याने गुगलची १.२ कोटी रुपयांची नोकरी देखील पटकावली. अब्दुल्ला खान (२१) असं या तरूणाचं नाव नाहे.


स्वप्न अर्धवट पण...

अब्दुल्लाला खरं तर मुंबई आयआयटीत जाऊन इंजिनिअरिंगचं शिक्षण घ्यायचं होतं. त्यासाठी त्याने आयआयटीची प्रवेश परीक्षा देखील दिली. परंतु या परीक्षेत तो नापास झाल्याने आयआयटीत शिक्षण घेण्याचं त्याचं स्वप्न अर्धवट राहिलं. परंतु इथंच न थांबता त्याने काॅम्प्युटर सायन्स शिकण्यासाठी मिरा रोडच्या श्री. एल. आर. तिवारी इंजिनिअरिंग काॅलेजमध्ये प्रवेश घेतला.


स्पर्धेत सहभाग

शिक्षण सुरू असताना एका प्रोग्रामिंग साइटवरील प्रोफाइल पाहून गुगलने त्याला गेल्या वर्षी एक इ-मेल पाठवला. हा मेल एका स्पर्धा परीक्षेचा होता. अब्दुल्लाने मोठ्या उत्सुकतेने या मेलला रिप्लाय केला आणि स्पर्धेची तयारीही केली. या स्पर्धेत सहभागी होऊन स्वत:ची क्षमता सिद्ध केली. त्यानंतर आॅनलाइन मुलाखत घेतल्यानंतर गुगलने अब्दुल्लाला वर्षाला १. २ कोटी रुपयांचं पॅकेज दिलं.


खास अनुभव

आपला अनुभव सांगताना अब्दुल्ला म्हणाला, “मी एका स्पर्धेत सहभागी झालो होतो. गुगल या स्पर्धेतील प्रोग्रॅमरच्या प्रोफाइलवर लक्ष ठेवत असेल, असं मला कधीच वाटलं नव्हतं. गुगलसोबत काम करण्याचा अनुभव माझ्यासाठी खास असणार आहे.”

येत्या सप्टेंबरपासून अब्दुल्ला गुगलच्या लंडन येथील आॅफिसमध्ये रूज होणार आहे.हेही वाचा-

गॉगल निवडताना या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर...

एव्हेंजर्स : इन्फिनिटी वॉरचे चाहते आहात? मग मार्व्हल्सच्या या कॅफेला भेट द्यासंबंधित विषय
ताज्या बातम्या