गॉगल निवडताना या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर...

स्टाईल म्हणून गॉगल हल्ली सर्वच वापरतात. अगदी लहानग्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच गॉगलचा वापर करतात. पण गॉगल फक्त स्टाईल आयकॉन नाही तर गॉगलमुळे तुमच्या डोळ्यांचं संरक्षणही होतं.

SHARE

उन्हातान्हात भटकायचं म्हणजे काय चेष्टा आहे का राव? त्वचेची, केसांची काळजी घेतो तशीच डोळ्यांचीही घ्यायला हवी ना! म्हणूनच मग उन्हाळ्यात गॉगल्सच्या फॅशनचं पेव फुटतं. सध्या गॉगल स्टाईल आयकॉन म्हणून ओळखला जातो. स्टाईल म्हणून गॉगल हल्ली सर्वच वापरतात. अगदी लहानग्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच गॉगलचा वापर करतात. पण गॉगल फक्त स्टाईल आयकॉन नाही तर गॉगलमुळे तुमच्या डोळ्यांचं संरक्षणही होतं. त्यामुळे गॉगल निवडताना काळजी घेणं गरजेचं आहे. आज आम्ही तुम्हाला गॉगल निवडताना काय काळजी घेतली पाहिजे याचीच माहिती देणार आहोत.

 • स्वस्त सनग्लासेस वापरू नये. नेहमी उत्तम क्वॉलिटीचे ग्लासेस खरेदी करा. स्वस्त ग्लासेसने डोळ्यांवर विपरित परिणाम होऊ शकतो.
 • उन्हात बाहेर जाताना त्वचेप्रमाणे डोळ्यांचीही काळजी घेतली पाहिजे. त्वचेचे अल्ट्राव्हायोलेट (अतिनील किरणे) किरणांपासून संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन लोशनचा उपयोग केला जातो. युव्ही कोटेड सनग्लासेसचा वापर करावा. कारण अल्ट्राव्हायोलेट किरणे डोळ्यांवर पडल्याने मोतीबिंदू होतो. रेटिनावरही परिणाम होतो.
 • वॉटर स्पोर्ट्स खेळणाऱ्यांनी युव्ही कोटेड गॉगल्सचा वापर करावा. न केल्यास डोळे लाल होऊ शकतात. डोळ्यांतून सतत पाणी येते. कॉर्लियावर परिणाम होतो.
 • सायकल चालवणे, धूळ, मातीमध्ये बाईक चालवतानाही युव्ही कोटेड गॉगल्सचा वापर करावा. दगड, माती आणि धुळीपासून डोळ्यांचे संरक्षण करावे.
 • गॉगल्स नेहमी त्याच्या कव्हरमध्ये ठेवावा आणि त्यांना नरम कपडयाने हलक्या हाताने पुसावे. ग्लासेसवर स्क्रेच पडता कामा नये.
 • आपल्या चेहऱ्याच्या त्वचेनुसार योग्य रंगाची फ्रेम निवडा. पांढरा आणि सिल्वर भडक दिसतो. हलका गोल्डन, काळा, ब्राउन रंगाची फ्रेम चांगली दिसते. तसंच गडद निळी फ्रेम चेहऱ्यावरील डाग लपवण्यात मदत करते. लाल फ्रेम चंकी-फंकी असल्यामुळे रेग्युलर यूज करणे योग्य ठरणार नाही.
 • ओव्हल फ्रेम ओव्हल चेहऱ्यावर सूट करत नाही. स्क्वेअर चेहऱ्यासाठी राउंड फ्रेम असलेले गॉगल्स छान दिसतात. तसंच राउंड किंवा ओव्हल शेप चेहऱ्यासाठी स्क्वेअर शेप फ्रेम सूट करेल.
 • गॉगल्सचा मधला भाग नाकावर येत असेल तर अशा गॉगल्समध्ये चेहरा लांब दिसतो. अशात गाल आणि डोळ्यांचा काही भाग दिसत असतो. अशी फ्रेम लहान चेहरा असणाऱ्यांसाठी योग्य असते.
 • जेव्हा गॉगल्सच्या मधला भाग ग्लासेसच्या अगदी मधोमध असल्यास लांब चेहरा लहान दिसतो. हा भाग खाली असल्यासही चेहरा लहान दिसतो. लांब चेहरा असल्यास ही फ्रेम सूट करते.
 • मोठया फ्रेमचे सनग्लासेस फॅशनमध्ये असले तरी आपण गॉगल्सचा आकार आपल्या चेहऱ्याप्रमाणे निवडावा. फॅशन म्हणून सामान्य चेहऱ्यावर मोठे गॉगल्स लावल्याने पूर्ण चेहरा झाकला जातो.
 • गॉगल्स लावल्यावर आपले नाक खेचले जात असेल तर हा आकार आपल्यासाठी योग्य नाही. आपण जरा मोठया आकाराचा गॉगल निवडायला हवा.
 • पॉलराईज्ड (Polarised) गॉगल हा गॉगलचा एक वेगळा प्रकार आहे जो चमकणाऱ्या प्रकाशात चांगली दृष्टी देण्याचं काम करतो. त्यामुळे पोलराईज्ड गॉगल असणाऱ्यांनी या भ्रमात राहू नये की आपला गॉगल डोळ्यांचे युव्ही रेडिएशनपासून देखील संरक्षण करतो. पोलराईज्ड आणि १०० टक्के युव्ही प्रोटेक्शन असं दोन्ही असलेला गॉगल सर्वोत्तम आहे.
संबंधित विषय
ताज्या बातम्या