Advertisement

Mitron app: 'मित्रों'वर महिन्याभरात ९ अब्ज व्हिडिओची नोंद

मित्रों अॅपवर जवळपास ९ अब्ज व्हिडिओ एका महिन्यात पाहिले गेले असून गूगल प्ले स्टोअरवर ३३ दशलक्ष यूझर्सनी हे अॅप डाऊनलोड केलं आहे.

Mitron app:  'मित्रों'वर महिन्याभरात ९ अब्ज व्हिडिओची नोंद
SHARES

सरकारने चिनी अॅपवर बंदी घातल्यानंतर एक महिन्यातच मित्रों या शॉर्ट-फॉर्म व्हिडिओ अॅपने त्याच्या प्लॅटफॉर्मवर प्रचंड प्रमाणात प्रेक्षकसंख्या मिळवली आहे. जवळपास ९ अब्ज व्हिडिओ एका महिन्यात पाहिले गेले असून गुगल प्ले स्टोअरवर ३३ दशलक्ष यूझर्सनी हे अॅप डाऊनलोड केलं आहे. ( mitron app gets 9 billion views in one month)

एप्रिल २०२० मध्ये शिवांक अग्रवाल आणि अनिश खंडेलवाल यांनी एकत्रितरित्या लाॅन्च केलेलं मित्रों हे अॅप सुरुवातीपासूनच लोकप्रिय ठरलं आहे. हलक्या-फुलक्या विनोदांचा धागा पकडत लोकांनी त्यांचे नावीन्यपूर्ण व्हिडिओ ऑनलाइन टाकावेत, जेणेकरून लोकांची डिजिटल गुंतवणूक आणि मनोरंजनाची नव्याने कल्पना केली जाईल, हाच या शॉर्ट फॉर्म व्हिडिओ अॅपच्या स्थापनेमागील उद्देश आहे.

हेही वाचा - Mitron App: ‘मित्रों’चे २.५ कोटी डाऊनलोड्स

मित्रोंचे संस्थापक आणि सीईओ शिवांक अग्रवाल म्हणाले, 'यूझर्सना विविध प्रकारचे शॉर्ट व्हिडिओ पाहणं आणि अपलोड करण्यासाठीचा प्लॅटफॉर्म देणं ही संकल्पना अॅप विकसित करण्यामागे होती. अगदी थोड्या कालावधीत मित्रोंने मिळवलेली लोकप्रियता पाहून आम्ही थक्क झालो आहोत. मित्रों प्लॅटफॉर्मवर लाखो नवे व्हिडिओ तयार होणं, हे अविश्वसनीय आहे. या अॅपवर दैनंदिन मनोरंजनाचा डोस घेणाऱ्या आमच्या सर्व अॅप यूझर्सना आम्ही धन्यवाद देतो.'

देशातील करनाल, हुबळी, भावनगर, अलिगड, लुधियाना आणि विजयवाडा यासारख्या लहान शहर आणि गावांतून आम्हाला तगडा प्रतिसाद मिळतोय. येथून १००,००० पेक्षा जास्त यूझर्स मिळाले आहेत, ” असं शिवांक पुढे म्हणाले.

सह-संस्थापक आणि सीटीओ अनिश खंडेलवाल म्हणाले, 'आमच्या यूझर्सची वाढ खूप उत्साहवर्धक आहे. यूझर्सची व्यग्रता वाढवणे व त्यांनी अॅपवर टिकून राहण्यासाठी आम्ही लक्षपूर्वक प्रयत्न करत आहोत. जवळपास प्रत्येक यूझर दररोज ८० व्हिडिओ पाहतो. तसंच अनेक नव्या उत्पादन सुविधांद्वारे आम्ही आणखी एंगेजमेंट वाढवू शकू, असा आम्हाला विश्वास आहे.'

हेही वाचा - टिक-टॉक अ‍ॅपकडे युजर्सची पाठ, भारतीय अ‍ॅप 'मित्रों'ला पसंती

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा