Advertisement

Mitron app: ‘मित्रों’चे २.५ कोटी डाऊनलोड्स

‘मित्रों’ या स्वदेशी शॉर्ट फॉर्म व्हिडिओ अॅपने गुगल स्टोअरवर २.५ कोटींहून अधिक डाऊलनोड करण्याचं यश मिळवलं आहे.

Mitron app: ‘मित्रों’चे २.५ कोटी डाऊनलोड्स
SHARES

‘मित्रों’ या स्वदेशी शॉर्ट फॉर्म व्हिडिओ अॅपने गुगल स्टोअरवर २.५ कोटींहून (25 million downloads for mitron app) अधिक डाऊलनोड करण्याचं यश मिळवलं आहे. जास्तीत जास्त कंटेंट क्रिएटर्सचा ओढा हे अॅप जॉइन करण्याकडे आहे. शॉर्ट व्हिडिओ मेकिंग अॅप असलेल्या मित्रोंवर दररोज जवळपास १० लाख नवे व्हिडिओ तयार होत असून दर तासाला ४ कोटी व्हिडिओ पाहिले जात आहेत. 

एप्रिल २०२० मध्ये शिवांक अग्रवाल आणि अनिश खंडेलवाल यांनी एकत्रितरित्या लाँच केलेले मित्रों हे अॅप सुरुवातीपासूनच लोकप्रिय ठरलं आहे. हलक्या-फुलक्या विनोदांचा धागा पकडत लोकांनी त्यांचे नावीन्यपूर्ण व्हिडिओ ऑनलाइन टाकावेत, जेणेकरून लोकांची डिजिटल गुंतवणूक आणि मनोरंजनाची नव्याने कल्पना केली जाईल, हाच या शॉर्ट फॉर्म व्हिडिओ अॅपच्या स्थापनेमागील उद्देश आहे.

हेही वाचा- टिक-टॉक अ‍ॅपकडे युजर्सची पाठ, भारतीय अ‍ॅप 'मित्रों'ला पसंती

मित्रोंचे संस्थापक आणि सीईओ शिवांक अग्रवाल म्हणाले, “ मित्रों प्लॅटफॉर्मवर दररोज जवळपास एक दशलक्ष नवे व्हिडिओ तयार होताना पाहून आम्हाला खूप आनंद होतो आहे. प्रत्येकजण लॉकडाऊनमध्ये ज्या वेळी घरात राहण्यासाठी बांधील होता, तेव्हाच लोकांना असा डिजिटल एंटरटेनमेंट प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्यावा, ज्यातून लोकांनी किंवा स्वत: टाकलेल्या शॉर्ट व्हिडिओद्वारे लोकांचे मनोरंजन होईल, असा आमचा उद्देश होता.”

मित्रों डेव्हलपरसाठी ग्राहकांची डेटा प्रायव्हसी ही प्राथमिकता आहे. हे अॅप यूझर्सना व्हिडिओ निर्मिती, संपादन आणि शेअर करण्यासाठी सोपं आणि अखंड इंटरफेस देऊ करतं. त्याचवेळेला प्लॅटफॉर्मवरील व्हिडिओची लायब्ररीदेखील उपलब्ध करून देतं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा