Advertisement

मोबाईलवर गेम खेळण्यात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर


मोबाईलवर गेम खेळण्यात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर
SHARES

मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार मोबाईल नेटवर्कच्या वापराचं 48 शहरात विश्लेषण करण्यात आलं. या अहवालात मोबाईल युझर्स आपला वेळ कसा गेम खेळण्यात घालवतात हे कंपनीनं स्पष्ट केलं आहे. यामध्ये गुजरात आणि महाराष्ट्रानं अव्वल क्रमांक पटकावला आहे.

अहमदाबादन १०० पैकी ७१.७ गुणांसह पहिला क्रमांक पटकावला आहे. अहमदाबादनंतर दुसऱ्या क्रमांकावर नवी मुंबईनं ७०.१ गुण मिळवले आहेत. बडोदा (६९.८), सुरत (६८), भोपाळ (६७.८), मुंबई (६७.८), ग्वाल्हेर (६७.७), इंदूर (६७.७), ठाणे (६५.७), राजकोट (६४.३) या शहरांचा नंबर लागतो.

इतर मोठ्या शहरांना अनुक्रमे दिल्ली, बंगळुरू आणि कोलकत्ता ५९.८, ६१.३ आणि ५७.२ असे गुण मिळाले आहेत. तर वाराणसी आणि तिरुवअनंतपुरमसारख्या शहरांमध्ये ही क्रमवारी ५० च्या खाली आहे.

ओपेंसिग्नलच्या म्हणण्यानुसार,परवडणारे स्मार्टफोन, कमी किमतीचा डेटा आणि इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे भारतात मोबाईल गेमिंग वेगानं वाढलं आहे. विशेष म्हणजे यात समान घटकांमुळे ऑनलाईन मोबाईल गेमिंगदेखील मोठ्या शहरांमध्ये स्तर २ आणि स्तर ३ वर पोहोचली आहे.

भारतात मोबाईल गेम्स मार्केटची किंमत सध्या अंदाजे १.१ अब्ज डॉलर्स इतकी आहे. ज्यात या वर्षात वापरकर्त्यांची संख्या अंदाजे ६२ कोटींवर पोहोचली आहे. ऑगस्ट सुरुवातीला सेंसर टॉवरनं दिलेल्या अहवालात असं दिसून आलं की, मोबाईल गेमवरचा खर्च वर्षानुवर्षे वाढतच आहे. त्यात २०२० मध्ये ते २७ टक्क्यांनी वाढला आहे. कोरोना काळात या आकड्यात आणखीन वाढ झाली आहे.



हेही वाचा

Apple IPhone-12 सीरिज लाँच, जाणून घ्या फिचर्स

बहुप्रतिक्षित प्रीमियम एसयूव्हीची बुकिंग १००,००० रुपयांत सुरु

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा