Advertisement

भारतीयांना अभिमान वाटेल असे इस्त्रोचे ६ महत्त्वाकांक्षी मिशन्स

येत्या काही वर्षांमध्ये इस्त्रो एक नाही, दोन नाही तर चक्क सहा मोहिम राबवणार आहेत. कुठल्या मोहीम आहेत याचीच माहिती आम्ही देणार आहोत.

भारतीयांना अभिमान वाटेल असे इस्त्रोचे ६ महत्त्वाकांक्षी मिशन्स
SHARES

२०१९ मध्ये चंद्रयान २ मोहिमेची जगात सगळीकडे चर्चा झाली. जरी या मोहिमेला अपयश आलं तरी सगळीकडे इस्त्रोचं कौतुक करण्यात आलं. पण चंद्रयान २ नंतर काय? असा प्रश्न अनेकांना पडला होता. पण संशोधक कधी थांबत नाहीत. कितीही अपयश येऊदे पण ते त्यांचं काम करतच राहतात. आता याचं उदाहरण द्यायचं झालं तर येत्या काही वर्षांमध्ये इस्त्रो एक नाही, दोन नाही तर चक्क सहा मोहिम राबवणार आहेत. कुठल्या मोहीम आहेत याचीच माहिती आम्ही देणार आहोत.

) चंद्रयान ३

चंद्रयान २ या मोहिमेत संशोधकांना अपयश आलंपण संशोधकांनी हार मानली नाही. तर ते पुढच्या तयारीला देखील लागले. चंद्राच्या अभ्यासासाठी चांद्रयान ३ पाठवण्याची इस्रोची योजना आहे. भारताचे हे तिसरे मून मिशन लाँच करणार असल्याची घोषणा नुकतीच करण्यात आली

डीप स्पेस ह्युमन मिशन्ससाठी चंद्र हा एक उत्तम पर्याय आहे. चंद्र हा एक उत्तम स्टेजिंग पॉईंट आहे. चांद्रयान २ द्वारे आपल्या स्पेस मिशन्ससाठी चंद्राचा कितपत उपयोग केला जाऊ शकतो, हे या मिशनमुळे आपल्याला कळू शकेल.


) आदित्य एल वन मिशन

चंद्रयान २ नंतर इस्रोनं आदित्य एल वन या मोहिमेची आखणी केली आहे. २०१९-२०२० ह्या वर्षांत आदित्य एल वन मिशन लाँच केलं जाईल. श्रीहरीकोटा हून PSLV रॉकेटवरून हे अवकाशयान अंतराळात प्रक्षेपित करण्यात येणार आहे. सध्या तरी या रॉकेटमध्ये व्हिजिबल एमिशन लाईन कोरोनोग्राफ (VELC ) हे १ पेलोड असणार आहे.

सूर्याचा अभ्यास करण्यासाठी पाठवण्यात येणारं इस्रोचं हे पहिलं अवकाशयान आहे. या यानाद्वारे आपल्याला सूर्याच्या फोटोस्फिअर, क्रोमोस्फिअर आणि करोना या तीन बाबींचा अभ्यास करणं शक्य होईल. सूर्याचं प्रभामंडळ म्हणजेच करोना हे सूर्यापासून हजारो किलोमीटर्सपर्यंत पसरलेलं आहे


) गगनयान मिशन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१८ साली यासंदर्भात घोषणा केली होती. ते म्हणाले होते की, आपला देश सुद्धा लवकरच अवकाशात अंतराळवीरांना पाठवणार आहे. आता हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. गगनयान मिशन द्वारे भारतीय अंतराळवीर अवकाशात झेपावतील


सध्या इस्रोमध्ये गगनयानच्या लाईफ सपोर्ट सिस्टीम आणि एन्व्हायर्नमेंटल कण्ट्रोल सिस्टीमचं काम सुरु आहे. या यानातून तीन अंतराळवीरांची टीम एकूण सात दिवसांसाठी अवकाशात पाठवण्यात येईल. डिसेंबर २०२१ मध्ये GSLV Mk III या रॉकेटद्वारे गगनयानचं प्रक्षेपण करण्यात येईल, असं सध्या योजलेलं आहे


) भारताचं स्पेस स्टेशन

२०२३ पर्यंत भारताचं स्पेस स्टेशन अवकाशात तयार करण्याची इस्रोची योजना आहे. सध्या अवकाशात फक्त एकच इंटरनॅशनल स्पेस स्टेशन कार्यरत आहे. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन केवळ २०२८ पर्यंतच कार्यरत असेल.

भारताचं स्पेस स्टेशन हे २० टन वजनाचं असेल आणि अंतराळवीर तिथं १५-२० दिवस वास्तव्य करू शकतील असा इस्रोचा प्रयत्न आहे. हे स्पेस स्टेशन म्हणजे गगनयान मिशनचा विस्तारित भाग असेल.


) मंगलयान २ मिशन (मॉम २)

मंगलयान २ किंवा मॉम २ हे मिशन २०२२ -२३ या वर्षांत पूर्ण करण्याची इस्रोची योजना आहे. हे भारताचं मंगळ ग्रहावर पाठवण्यात येणारं दुसरं मिशन असेल. मंगलयान २ चं ऑर्बिटर एरोब्रेक्सचा वापर करून मंगळाच्या कक्षेच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे मंगळाचा अधिक जवळून अभ्यास करणं शक्य होणार आहे.



) शुक्रयान मिशन

शुक्र हा ग्रह आपल्यापेक्षा सूर्याच्या ३० टक्के जवळ आहे. त्यामुळे शुक्रावर पृथ्वीपेक्षा अधिक सोलर रेडिएशन आहे आणि उष्णता देखील प्रचंड आहे. त्यामुळे शुक्र ग्रहाचा अभ्यास करणं हे इस्रोचं ध्येय आहे. हे मिशन २०२३-२५ दरम्यान पार पाडले जाण्याची शक्यता आहे.

इस्रोचं शुक्रयान शुक्राच्या घनदाट आणि रहस्यमयी वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी पाठवलं जाईल. शुक्राच्या वातावरणात इतके दाट ढग आहेत की त्याचा पृष्ठभागापर्यंत सूर्याचा उजेड पोचणं अवघड आहे. याचाच अभ्यास करून शुक्र ग्रहाविषयी अधिक माहिती मिळवण्याचा इसरोचा उद्देश आहे





संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा