Advertisement

पालिकेच्या कामांचा दर्जा लवकरच सुधारणार


पालिकेच्या कामांचा दर्जा लवकरच सुधारणार
SHARES

मुंबई - पालिकेला सध्या बांधकामाच्या दर्जामुळे मोठ्या टीकेला सामोरं जावं लागतंय. यापुढे मात्र पालिकेच्या बांधकामाच्या दर्जा सुधारणार आहे. कारण बांधकामाचा दर्जा सुधारण्यासाठी आता पालिकेनं अत्याधुनिक उपकरणांचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत उपकरणे लवकरच पालिकेकडून खरेदी करण्यात येणार आहेत. माहिती दक्षता खात्याचे प्रमुख अभियंता मनोहर पवार यांनी ही माहिती दिली.
काँन्क्रीट गेज, डिजीटल थर्मोमीटर, डिस्टन्स लेझर मीटर, कोरोजन डिटेक्टर, बॉण्ड टेस्ट यंत्र, एल्कोमीटर, प्रोफोस्कोप, मॉयश्चर मीटर अशा अनेक उपकरणांचा यात समावेश आहे. या उपकरणाद्वारे रस्त्याची आणि भिंतीची जाडी, रंगाचे थर, स्लॅब-बीममधील जाळ्या गंजल्या आहेत का यासह बांधकामातील गुणवत्तेची माहिती सहज उपलब्ध होणाराय.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा