Advertisement

शौक बडी चिज है! अवघ्या १५ मिनिटांत आयफोन x 'आऊट आॅफ स्टाॅक'

आयफोन x च्या प्री बुकींगला शुक्रवारी सुरूवात होताच अवघ्या १५ मिनिटांत हा फोन 'आऊट आफ स्टाॅक' झाला.

शौक बडी चिज है! अवघ्या १५ मिनिटांत आयफोन x 'आऊट आॅफ स्टाॅक'
SHARES

जबरदस्त परफाॅर्मन्स आणि हायएण्ड लूक असणारा लेटेस्ट आयफोन सर्वात पहिल्यांदा आपल्या हाती असावा, अशी इच्छा असणाऱ्या मोबाइलधारकांची आपल्याकडेही कमी नाही. त्यामुळेच आयफोन x च्या प्री बुकींगला शुक्रवारी सुरूवात होताच अवघ्या १५ मिनिटांत हा फोन 'आऊट आफ स्टाॅक' झाला.

आयफोन x च्या प्री बुकींगला २७ आक्टोबरला दुपारी १२.३१ मिनिटांनी सुरूवात झाली आणि १२.४५ पर्यंत हा फोन चक्क आऊट आफ स्टाॅकही झाला. अॅपलने आपल्या १० व्या वर्धापनदिनी १२ सप्टेंबरला आयफोनच्या चाहत्यांना आयफोन ८, ८ प्लस आणि आयफोन x ची भेट दिली. त्यापैकी आयफोन ८ आणि ८ प्लसमधील फिचर्स ग्राहकांच्या फारसे पसंतीस उतरले नसल्याने ग्राहक आयफोन x च्या प्रतिक्षेत होते. प्री बुकींग केलेल्या ग्राहकांच्या हातात हा फोन ३ नोव्हेंबरपासून येईल.


आयफोनचा x फॅक्टर तारणार का?

आयफोनचे मागचे काही एडिशन पाहिले तर फिचरवाईज त्यात फार इनोव्हेटीव्ह बदल दिसून आलेले नाहीत. आयफोन ६ आणि ६ एस मध्ये फार फरक नाही. तसंच ६ एस आणि ७ मध्येही नाममात्र फरक आहेत. त्याला फारतर कॅमेरा आणि फिचर्सचं अपग्रेडेशन म्हणता येईल. युनिक आणि इतरांपेक्षा नवीन फिचर्स देणारी कंपनी म्हणून अपल ओळखली जाते. ८ आणि ८ प्लस मध्ये नेमक्या याच युनिकनेसचा अभाव असल्याने या फोनला ग्राहकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यातुलनेत आयफोन x मधील फिचर्समध्ये नाविन्य असल्याने ग्राहकांकडून या फोनला चांगला प्रतिसाद अपेक्षित असल्याचं आयफोन विक्रेते शंकर सकपाळ यांनी सांगितलं.



काय आहेत आयफोन x चे फिचर्स?

  • आयफोनचा एकमेव फोन ज्यात OLED डिस्प्ले
  • ५.८ इंच स्क्रीन, ११२५x२४३६ पिक्सल रिज्योल्युशन
  • वॅटरप्रुफ बॅडी, वायरलेस चार्जिंग
  • A११ Bionic प्रोसेसर, M११ motion को-प्रोसेसर
  • होम बटन नाही, फिंगर प्रिंट सेन्सर नाही. चेहरा ओळखून फोन अनलॉक
  • ६ कोअर A११ चिपसेट
  • १२ मेगापिक्सलचे २ रिअर कॅमेरे, ७ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा
  • ६४ जीबी आणि २५६ जीबी स्टोरेजच्या क्षमतेचे दोन मॉडेल्स
  • ६४ जीबीच्या फोनची किंमत ८९,००० रुपये तर, २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १,०२,००० रुपये


नोटाबंदीपासून ग्राहकांनी हात आखडता घेतल्याने फोनविक्री निम्म्याहून अधिक प्रमाणात घटली आहे. त्यामुळे बिझनेसला मोठा फटका बसलाय. जिथे आम्ही महिन्याला ६० ते ७० लाखांची उलाढाल करत होतो. तेथे आमची उलाढाल १० ते २० लाखांवर आलीय. त्यामुळे आम्ही सर्व्हिसिंगला प्राधान्य देत आहोत. त्यातही आयफोन ८ आणि ८ प्लस ग्राहकांच्या पसंतीस न उतरल्याने दिवाळीत चांगला बिझनेस होऊ शकलेला नाही. त्यामुळे आता आमचं सगळं लक्ष आयफोन x च्या विक्रीकडे लागलं आहे. या फोनच्या प्री बुकींगला सुरूवात झाली असून आमच्याकडे पहिल्या काही मिनिटांत ५ ते ६ ग्राहकांनी फोनसाठी बुकींग केलं आहे.
- शंकर सकपाळ, देव सोल्युशन, आयफोन विक्रेते

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा