Coronavirus Updates: २४ तासांसाठी 'पबजी' शटडाऊन

जगभरात प्रसिद्ध असलेला पबजी गेम खेळणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे.

Coronavirus Updates: २४ तासांसाठी 'पबजी' शटडाऊन
SHARES

जगभरात प्रसिद्ध असलेला पबजी गेम खेळणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे. त्यामुळं अनेकांनी घरी बसून पबजी खेळण्याला पसंती दिली होती. परंतु, आता या पबजी चाहत्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. पबजी 'शटडाऊन' करण्यात आला असून, पबजी २४ तासांसाठी बंद आहे. शनिवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते ५ एप्रिलच्या रात्री १२ वाजेपर्यंत पबजी 'शटडाऊन' करण्यात आला आहे.

जगातील टॉप मोबाइल व्हिडिओ गेमपैकी एक असलेल्या पबजीचे वेड अनेकांना लागले आहे. भारतासह संपूर्ण जगभरात पबजीचे लाखो जण चाहते आहेत. २०१९ पासून अनेक तरुणांनी पबजीच्या वेडापायी खाणे-पिणे सोडल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. घर सोडल्याच्या बातम्याही आपण ऐकल्या आहेत. दरम्यान, जगभरात पबजी २४ तास बंद राहणार असल्याची माहिती कंपनीनं स्वतः युजर्संना नोटिफिकेशन पाठवून दिली आहे. त्यामुळं पबजीच्या चाहत्यांना २४ तास पबजी गेम खेळता येत नाही. 

पबजीची ही माहिती आपल्या युजर्संना कळावी यासाठी कंपनीकडून युजर्संना ‘Temporary Suspension of Service’ असे नोटिफिकेशन पाठवले जात आहे. पबजी २४ तास बंद करण्याचा कंपनीने निर्णय घेतला. कंपनीचा हा निर्णय घेण्यामागेही करोना व्हायरस आहे. सध्या करोना व्हायरसमुळे जगभरात भीती पसरली आहे. जगभरात हजारो जणांचा बळी गेला आहे. तर लाखो लोकांना करोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे.

संबंधित विषय