Advertisement

'स्मार्ट इंडिया हॅकथॉन 2017' चा शुभारंभ


'स्मार्ट इंडिया हॅकथॉन 2017' चा शुभारंभ
SHARES

माटुंगा - मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण मंडळातर्फे जगातल्या सर्वात मोठ्या हॅकथॉनचे भारतात आयोजन करण्यात आले आहे. या हॅकथॉनचे उद्घाटन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर आणि अखिल भारतीय तंत्र शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते शनिवारी वेलिंगकर इन्स्टिट्यूट मध्ये झाले. 

प्रकाश जावडेकर यांनी वेलिंगकर इन्स्टिट्यूटच्या सभागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे देशातून 26 ठिकाणांहून सहभाग घेणाऱ्या 10,000 हून अधिक विद्यार्थांना संबोधित केले. देशभरातून आलेल्या तरुण-तरुणी समाज आणि देशाच्या विविध समस्या सोडवण्यासाठी हॅकिंग म्हणजेच या हॅकथॉन इव्हेंट द्वारे नवीन तंत्रज्ञान देशाला मिळवून देणार आहेत.

'स्मार्ट इंडिया हॅकथॉन 2017', ही 10 हजारहून अधिक इंजिनियरिंग आणि व्यवस्थापनाचे विद्यार्थी सहभागी असणारी, देशभरातील 32 टीम्ससह सलग 36 तास काम सुरु असणारी संगणकीय स्पर्धा आहे. समाज आणि देशासमोरील समस्यांवर उपाय शोधण्यासाठी तरुणाईला एकत्रित करून विकासाच्या प्रतिक्रियेत हातभार लावावा हा यामागचा उद्देश आहे. देशातल्या 2138 इंजिनियरिंग आणि व्यवस्थापकीय शिक्षण संस्थांमधल्या तब्ब्ल 42 हजार विद्यार्थ्यांमधून, 29 संस्थांमधल्या 10 हजारहून अधिक तरुण नवसंशोधकांची यासाठी निवड करण्यात आली. या उपक्रमासाठी 26 शैक्षणिक नोडल सेन्टर्स असून, यात 1266 टीम्स देशीतील विविध राज्यातल्या 26 ठिकाणी तळ ठोकून रेल्वे, पोस्ट, स्टील, इसरो, बालहक्क सुरक्षा या सारख्या समस्या सोडविण्यासाठी काम करणार आहेत. हॅकथॉन 2 दिवस असून,शेवटच्या दिवशी ज्युरींनी निवडलेल्या उत्कृष्ट प्रोजेक्टला पारितोषिकही देण्यात येणार आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा