Advertisement

तुमचा स्मार्टफोन तुमच्यावर नजर तर नाही ठेवत?

मायक्रोफोन फिचरच्या मदतीनं फेसबुकसुद्धा आपलं बोलणं ऐकू शकतं. समजा आपण आपला फोन बाजूला ठेवून आपल्या एका मित्राबरोबर गप्पा मारतोय. गप्पांच्या ओघात आपल्या तोंडून तिसऱ्या मित्राचं नाव निघालं जो फेसबुकवर आपला मित्र नाही. तर अशावेळेस या तिसऱ्या मित्राचं नाव फेसबुक लक्षात ठेवतं आणि काही दिवसातच ‘People You May Know’ च्या लिस्टमध्ये तुम्हाला तुमचा तिसरा मित्र दिसून येतो.

तुमचा स्मार्टफोन तुमच्यावर नजर तर नाही ठेवत?
SHARES

ज्याचं कुणी नाही त्याचं गुगल आहे हे आपण अनेकदा मस्करीत का होईना पण बोलले असू. पण प्रत्यक्षात पाहिलं तर हे वक्तव्य सध्याच्या परिस्थितीशी तंतोतंत जुळतं. समजा एखाद्या प्रश्नाचं उत्तर कुणाकडे नसेल. पण गुगलकडे मात्र तुमच्या सर्वच प्रश्नाची उत्तरं आहेत. एवढंच नाही तर तुम्ही गुगलवर काय सर्च करता याची माहिती देखील गुगल साठवून ठवतं. ही माहिती विकण्याची गुगलला परवानगी देखील आहे. तुम्ही काय सर्च करता यावर गुगलची करडी नजर असते. पण फक्त गुगलच नाही तर तुमचा स्मार्टफोन देखील तुमच्यावर नजर ठेऊन असतो. तुमचा विश्वास नसेल बसत. पण हे खरं आहे.


अॅप डाऊनलोड करताना...

मोबाइलमध्ये एखादं अॅप डाऊनलोड करताना काळजी घेतली पाहिजे. एखादं अॅप डाऊनलोड करताना येणारे मेसेज नीट वाचले पाहिजे. अॅप इंस्टॉल करताना अॅप परमिशन म्हणून मायक्रोफोनची परमिशन मागितली जाते. या पॉपअॅपवर क्लिक केलं की त्या अॅपला आपला मायक्रोफोन वापरण्याची परवानगी मिळते. आवाजाद्वारे अॅपवर काहीही सर्च करता यावं यासाठी हे फिचर डेव्हलप करण्यात आलं. पण या फिचरला आपल्यावर नजर ठेवण्यासाठीही वापरलं जाऊ शकतं.


फेसबुकद्वारे चोरून ऐकलं जातं

मायक्रोफोन फिचरच्या मदतीनं फेसबुकसुद्धा आपलं बोलणं ऐकू शकतं. समजा आपण आपला फोन बाजूला ठेवून आपल्या एका मित्राबरोबर गप्पा मारतोय. गप्पांच्या ओघात आपल्या तोंडून तिसऱ्या मित्राचं नाव निघालं जो फेसबुकवर आपला मित्र नाही. तर अशावेळेस या तिसऱ्या मित्राचं नाव फेसबुक लक्षात ठेवतं आणि काही दिवसातच ‘People You May Know’ च्या लिस्टमध्ये तुम्हाला तुमचा तिसरा मित्र दिसून येतो. फेसबुक आपलं बोलणं चोरून ऐकत आहे याचा एक प्रयोग Neville नावाच्या तरुणाने नोव्हेंबर २०१७ ला करून बघितला होता.


परवानगी देण्याआधी हे वाचा

फेसबुक किंवा अॅपशिवाय अॅपल फोन्समध्ये असलेलं श्री (Siri), मोबाइलमध्ये डाऊनलोड वेगवेगळे गेम्स सुद्धा मायक्रोफोनद्वारे बोलणं रेकॉर्ड करण्याचं काम करतात असं म्हटलं जातं. बहुदा सर्व माहिती घेऊन जाहिरातींचा भडिमार युजर्सवर केला जातो. त्यामुळे कुठल्याही अॅपला परवानगी देताना विचार करा. गरज असेल तरच अॅप्सला परवानगी द्या.

कव्हर फोटो सौजन्य


हेही वाचा

तुमच्या महत्त्वाच्या डॉक्यूमेंट्ससाठी डिजीलॉकरचा नवा पर्याय
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा