मुंबई - कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी सुरू राहावा यासाठी दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात हयातीचा दाखला किंवा लाइफ सर्टिफिकेट सादर करावे लागते. मात्र आता हा दाखला डिजीटल पद्धतीने सादर करण्याची सुविधा कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) उपलब्ध करून दिलीय.यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांची सोय होणार आहे. त्याचप्रमाणे नोव्हेंबर महिन्यात प्रवास करत असलेल्या, तसेच परदेशी गेलेल्या लोकांना यामुळे दिलासा मिळणार आहे. कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी सुरू ठेवण्यासाठी पेन्शन लागू होणाऱ्या सर्वांना हयातीचा दाखला दरवर्षी नोव्हेंबरमध्ये द्यावा लागतो. पेन्शनर्सनी त्यांच्या बँक शाखेत किंवा ईपीएफओच्या मुंबईतील वांद्रे येथील क्षेत्रीय कार्यालयात, जीवन प्रमाण केंद्रावर किंवा कॉमन सर्व्हिस सेंटरवर जाऊन नोंदणी करावी. यासाठी पेन्शनरांनी सोबत पीपीओ क्रमांक, बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक व मोबाइल क्रमांक घेऊन जावा, असे आवाहन ईपीएफओनं केलं आहे.