SHARE

अॅलन मस्क यांच्या टेसला कंपनीनं आपली बहुप्रतिक्षित 'टेसला एक्स' ही विजेवर चालणारी जगातील पहिली एसयुव्ही बाजारात लाँच केली आहे. मुंबईत या गाडीचे आगमन झाले आहे. गुरुवारी ही कार डॉकयार्ड परिसरात दिसली. गेल्या अनेक वर्षांपासून 'टेसला एक्स' या मॉडेलची प्रतिक्षा होती. २०१२ सालीच कंपनीनं यासंदर्भात माहिती दिली होती. त्यानुसार टेसला कंपनीचे संस्थापक अॅलन मस्क यांनी एका कार्यक्रमात ही एसयुव्ही सादर केली.

टेसला एक्सचे वैशिष्ट्य

  • पूर्णपणे विजेवर धावणारी कार
  • ९० kWhची बॅटरी असून ती एकदा चार्ज केल्यानंतर ही कार २९५ मैल (४७४.७ किलोमीटर) धावेल
  • या मॉडेलचा वेग १५५ मैल म्हणजे सुमारे २५० किलोमीटर प्रतितास असल्याचा कंपनीचा दावा
'टेसला एक्स'चा लुक अतिशय आकर्षक आहे. सात प्रवासी आरामात यात बसू शकतात. कारचे दरवाजे उघडल्यानंतर वरच्या बाजूला पंख उघडल्यासारखे दिसतात. या कारमध्ये सर्व सुविधा आहेत. पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या कारपेक्षा ही कार सोयीस्कर आहे. त्यामुळे टेसला एक्स ही गाडी महागडी आहे. अमेरिकेत या कारची किंमत ८०,००० डॉलर इतकी आहे. तर भारतात या कारची किंमत जवळपास ५५ लाख आहे!

संबंधित विषय
ताज्या बातम्या