Advertisement

आधार कार्ड हरवलंय? नॉट टू वरी

हल्ली कुठल्या कामात आधार कार्ड लागतंच लागतं. पण समजा आधार कार्ड जर हरवलं तर तुमची किती कामं रखडतील. समजा हे आधार कार्ड हरवलं तर? टेंशन नॉट... या टिप्सच्या मदतीनं मिळवा डुप्लिकेट आधार कार्ड.

आधार कार्ड हरवलंय? नॉट टू वरी
SHARES

पॅनकार्डनंतर ओळखपत्र म्हणून आधार कार्डला सर्वात जास्त महत्त्व देण्यात आलंय. हल्ली कुठल्या कामात आधार कार्ड लागतंच लागतं. पण समजा आधार कार्ड जर हरवलं तर तुमची किती कामं रखडतील. आज आम्ही तुम्हाला हरवलेलं आधार कार्ड कसं शोधाल हे सांगणार आहोत. यासाठी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत.

१) आधार कार्डसाठी https://uidai.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन नवीन आधार कार्ड मिळवू शकता. याद्वारे तुम्हाला तुमच्या आधार कार्डची डिजिटल कॉपी देखील मिळू शकते. यासाठी तुमच्याकडे रजिस्टर्ड मोबाइल क्रमांक किंवा इमेल आयडी असणं गरजेचं आहे.

2) आधार कार्डला जोडलेला क्रमांक बंद झालेला असेल तर सध्या वापरत असलेल्या नंबरवरून तुम्ही आधार कार्डची कॉपी मिळवू शकता.

३) https://uidai.gov.in/ या वेबसाईटवर क्लिक करा.

४) त्यानंतर माय आधार (My Aadhaar) मेन्यूवर क्लिक करून आधार रिप्रिंट ( Aadhaar Reprint) वर क्लिक करा.

५) तुमचा आधार कार्ड क्रमांक आणि सिक्युरिटी कोड (Security Code) लिहा.

6) त्याखाली तुम्हाला If you do not have a registered mobile number, please check in the box हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करून तुमचा चालू मोबाईल क्रमांक लिहा.

७) तुमच्या मोबाइलवर एक ओटीपी नंबर येईल. तो ओटीपी तुम्हाला ओटीपी बॉक्समध्ये भरायचा आहे.

८) त्यानंतर आवश्यक फीड भरल्यानंतर काही दिवसातच आधार कार्डची नवी कॉपी तुम्हाला पाठवली जाईल.

९) सर्व माहिती भरल्यानंतर आय हॅव टीओटीपी (I have TOTP) यावर क्लिक करा.

१०) समजा आधार कार्ड काही दिवसात आलं नाही तर तुम्हाला १४ अंकी सर्व्हिस रिकवेस्ट नंबर क्रमांक दिला जातो. या क्रमांकाच्या मदतीनं तुम्ही आधार कार्ड स्टेटस पाहू शकता.



हेही वाचा -

'असा' ओळखा तुमच्या आधार कार्डचा गैरवापर




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा