मतदारांसाठी 'ट्रू व्होटर’ अ‍ॅप

 Pali Hill
मतदारांसाठी 'ट्रू व्होटर’ अ‍ॅप
मतदारांसाठी 'ट्रू व्होटर’ अ‍ॅप
See all

मुंबई - महापालिका आणि निवडणूक आयोगानं 'ट्रू व्होटर' नावाचं मोबाईल अॅप तयार केले आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना घरबसल्या वॉर्ड आणि पोलिंग बुथची माहिती मिळावी हा या मागचा उद्देश आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात हे अ‍ॅप मतदारांना मोबाईलवर उपलब्ध होईल.

मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळे मतदारांसाठी अ‍ॅप बनवण्याची तयारी सुरू असून यासाठी आवश्यक माहिती गोळा केली जातेय. 227 वॉर्डपैकी 90 टक्के वॉर्डची पुनर्रचना झाली आहे. यामुळे मतदारांना आपण नेमके कोणत्या वॉर्डमध्ये आहोत हे कळण्यासाठी या अ‍ॅपची मदत होणार आहे, असं पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं स्पष्ट केलं.

जीआयएस मॅपिंगची मदत

जीआयएस मॅपिंगवर हे अ‍ॅप्लिकेशन आधारित आहे. याआधी महापालिकेने नोंदणीकृत मतदारांचं सर्वेक्षण केले आहे. मुंबईत 87 लाख नोंदणीकृत मतदार आहेत. तर मतदार जनजागृती मोहिमेंतर्गत तीन लाख नवीन मतदारांचीही नोंद झाली आहे. त्यामुळे या जीआएस मॅपिंगमुळे कोणता मतदार कोणत्या वॉर्डात आहे हे कळणार आहे.

Loading Comments