Advertisement

व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम, फेसबुक डाऊन; वापरकर्त्यांचा संताप

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुक जगभरातील अनेक ठिकाणी ठप्प झालं आहे.

व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम, फेसबुक डाऊन;  वापरकर्त्यांचा संताप
SHARES

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुक जगभरातील अनेक ठिकाणी ठप्प झालं आहे. यामुळं वापरकर्त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. फेसबुकनं आपल्या वेबसाईटवर मॅसेज लिहीत दिलगिरी व्यक्त केली आहे.

'माफ करा, काहीतरी चुकीचं झालं आहे. आम्ही गुंता सोडवण्याचं काम करत आहोत. लवकरच सर्व काही सुरळीत होईल', असं फेसबुकनं आपल्या मॅसेजमध्ये लिहीलं आहे. वेब आणि स्मार्टफोन या दोन्ही ठिकाणी तिन्ही अ‍ॅप चालत नाहीत. अँड्रॉइड, आयओएस आणि वेबवर तिन्ही अ‍ॅप ठप्प आहेत.

लोकांनी पाठवलेले मॅसेज अर्ध्यावरच अडकले आहेत. डाउन डिटेक्टरवर लोकांनी याबाबतच्या तक्रारी दिल्या आहेत. भारतात फेसबुकचे ४१० दशलक्षाहून अधिक, व्हॉट्सअ‍ॅपचे ५३० दशलक्षाहून अधिक वापरकर्ते आहेत. इन्स्टाग्रामचे भारतात २१० दशलक्षाहून अधिक वापरकर्ते आहेत. या तिन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी भारत मोठी बाजारपेठ आहे.

सोशल मीडिया वापरकर्त्यांनी ट्वीटरवर मॅसेज पोस्ट करत व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुक बंद असल्याची माहिती दिली आहे. रात्री ९ वाजल्यापासून अडचण येत असल्याचं सांगण्यात येत आहे. यानंतर ट्वीटरवर मीम्सचा पाऊस पडला आहे. वापरकर्ते व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुक डाऊन असल्याने ट्वीटरवर पोस्ट करत आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा