Advertisement

फेसबुक स्मार्टवॉच लाँचिंगसाठी सज्ज, किंमत जाणून व्हाल थक्क

फेसबुक स्मार्टवॉचमध्ये अनेक न्यू जनरेशन फीचर्स मिळतील.

फेसबुक स्मार्टवॉच लाँचिंगसाठी सज्ज, किंमत जाणून व्हाल थक्क
SHARES

अ‍ॅपल स्मार्टवॉचनंतर आता फेसबुक (Facebook) कंपनीदेखील आपलं स्मार्टवॉच लाँच करू शकते. हे लॉन्च पुढील वर्षाच्या सुरूवातीस होऊ शकतं. सोशल मीडिया दिग्गज कंपनीनं म्हटलं आहे की, त्यांनी या स्मार्टवॉच लाँचिंगसाठी पूर्ण तयारी केली आहे. सध्या या स्मार्टवॉचच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या जनरेशनवर काम सुरू आहे.

फेसबुक स्मार्टवॉचमध्ये अनेक न्यू जनरेशन फीचर्स मिळतील. डिव्हाइस बॉडीमध्ये दोन कॅमेरे दिले जातील, तसंच यात डिटॅचेबल डिस्प्ले मिळेल.

फेसबुक स्मार्टवॉचच्या मदतीनं युजर्स डिव्हाइसद्वारे मेसेज पाठवू शकतील. स्मार्टवॉचमध्ये आपल्याला हेल्थ आणि फिटनेसशी संबंधित अनेक फीचर्स आढळतील. फेसबुक स्मार्टवॉच थेट Apple स्मार्टवॉचशीच नव्हे तर सॅमसंग, वनप्लस, ओप्पो, शाओमी, व्हिवो आणि इतर कंपन्यांनानादेखील तगडी स्पर्धा देईल.

पुढील वर्षी फेसबुक स्मार्टवॉच लॉन्च केलं जाऊ शकतं. आगामी स्मार्टवॉच भारतासह इतर सर्व देशांमध्ये उपलब्ध होणार आहे. या स्मार्टवाचच्या फीचर्सविषयी बोलायचं झाल्यास, यामध्ये मोठा डिस्प्ले देण्यात येईल जो आपण बाहेर काढू (डिटॅचेबल) शकता. तसंच यात आपल्याला दोन कॅमेरे मिळतील. दोन्ही कॅमेरे वेगवेगळ्या प्रकारे काम करतील.

डिटॅचेबल पार्ट काढून तुम्ही फोटो आणि व्हिडीओ क्लिक करु शकता. आपल्याला माहित आहे की, फेसबुक कंपनी हे घड्याळ बनवत आहे. त्यामुळे तुम्ही इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅपवर काहीही शेअर करू शकता. फेसबुक स्मार्टवॉचचा फ्रंट कॅमेरा व्हिडीओ कॉलिंगलाही सपोर्ट करेल. त्याच वेळी, फोटो आणि व्हिडिओ कॅप्चर करण्यासाठी कंपनी मागील बाजूस HD कॅमेरा प्रदान करेल. यामध्ये कॉलिंग, फोन, मेसेजिंग, LDTE, हेल्थ आणि फिटनेसशी संबंधित फिचर्स मिळतील.

स्मार्टवॉच तीन रंगांमध्ये सादर करण्यात येणार आहे. ज्यात व्हाइट, ब्लॅक आणि गोल्ड रंगांचा समावेश आहे. कंपनी ब्लू व्हर्जनदेखील लाँच करू शकते. स्मार्टवॉचची किंमत ४०० डॉलर इतकी असू शकते. त्याचबरोबर भारतात त्याची किंमत ३० हजार रुपये इतकी असू शकते.संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा