Advertisement

फी न भरल्यामुळे मुलीला क्लासमधून काढलं, अभिनेता जावेद हैदरचा आरोप

शाळेनं आठवीत शिकणार्‍या जावेदच्या मुलीला ऑनलाइन वर्गातून काढून टाकलं.

फी न भरल्यामुळे मुलीला क्लासमधून काढलं, अभिनेता जावेद हैदरचा आरोप
SHARES

कोरोना व्हायरसमुळे झालेल्या लॉकडाउनमुळे लाखो लोकांनी आपल्या नोकर्‍या गमावल्या. सिनेमा, टीव्ही आणि नाटकांमध्ये काम करणारे अभिनेते, तंत्रज्ञ आणि रोजंदारीवरच्या मजूरांना या लॉकडाउनचा सर्वाधिक फटका बसला.

काम न मिळाल्यामुळे गेल्या एका वर्षात बर्‍याच टीव्ही कलाकारांची आर्थिक परिस्थिती ढासळली. असंच काहीसं प्रसिद्ध टीव्ही आणि सिनेअभिनेता जावेद हैदर याच्या बाबतीत घडलं. त्याच्याकडे आपल्या मुलीच्या शाळेची फी भरण्याइतकेही पैसे देखील उरले नाहीत.

'आज तक' शी बोलताना जावेद हैदर म्हणाला की, त्यानं बर्‍याच सिनेमांत आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. लोक त्याला ओळखतात पण लॉकडाउनमध्ये काम नसल्यामुळे त्याला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला.

आपल्या मुलीची शाळेची फी भरण्यासाठीही पैसे नसल्याचं जावेदनं सांगितलं. परिस्थिती इतकी बिकट झाली की, शाळेनं आठवीत शिकणार्‍या जावेदच्या मुलीला ऑनलाइन वर्गातून काढून टाकलं. जावेद यांनी गेल्या काही महिन्यांपासून फी भरण्यास सक्षम नसल्याचं सांगितलं. मुलीच्या शाळेची महिन्याची फी २ हजार ५०० रुपये आहे.

जावेद पुढे म्हणाला की, मुलीचं शिक्षण थांबू नये म्हणून त्याने मोठ्या मुश्किलीनं शाळेची फी गोळा केली आहे. जावेद म्हणाला की, 'सिनेसृष्टीत अनेक बडे कलाकार मला ओळखतात. पण मी कधीही कोणाकडे मदत मागायला गेलो नाही. कारण मला पैसे मागायला लाज वाटते.'

जावेदनं 'खुद्दार', 'राम जाने', 'गुलाम', 'दबंग ३' आणि 'वॉन्टेड' अशा बर्‍याच सिनेमांत काम केलं आहे. जावेदनं प्रसिद्ध टीव्ही शो 'जिनी और जूजू'मध्येही काम केलं होतं.

दरम्यान, राज्य सरकारनं खाजगी शाळांच्या मनमानीला कारभाराला चाप लावला आहे. शाळेच्या फी मध्ये राज्य सरकारनं १५ टक्क्यांची कपात केली आहे. लवकरच सरकारच्या या नियमाची अमलबजावणी केली जाणार आहे. राज्य सरकारनं घेतलेल्या या निर्णयामुळे पालकांना दिलासा मिळाला आहे.



हेही वाचा

शर्लिन चोप्रा, पूनम पांडेला दिलासा; २० सप्टेंबरपर्यंत कारवाई न करण्याचे निर्देश

KRK वर बलात्काराचा आरोप, मॉडेलनं केली पोलिसात तक्रार

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा